विशेष प्रतिनिधी
Kolhapur News: ‘महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा मंत्रिमंडळातील मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही’, असा इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर आक्रमक भूमिका घेतली आहे.
सगळी साेंगे आणता येतात पण पैशाचे साेंग आणता येत नाही. त्यामुळे पुढील दाेन वर्षे तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नसल्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टपणे सांगितले. यावरूनच आता राजू शेट्टी पत्रकार परिषदेत बाेलताना म्हणाले, महायुतीने शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं आश्वान दिलं.
पण आता अजित पवारांनी सांगितलं कर्जाचे पैसे भरा. या क्षणाला अनेक शेतकरी थकबाकीदार आहेत. त्या शेतकऱ्यांना बँकांनी नोटीस काढल्या आहेत. यावरून राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था काय आहे हे लक्षात येतं. खरं तर लोकांनी शेतकऱ्यांचं दुहेरी नुकसान केलं आहे. राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँका देखील अडचणीत आलेल्या आहेत. आता कर्ज माफ झालं नाही म्हणून शेतकऱ्यांना एकीकडे जप्तीच्या नोटीसा येत आहेत.
दुसरीकडे वेळेत कर्ज न भरल्याप्रकरणी व्याज सवलत मिळत नाही. तसेच त्या शेतकऱ्यांचा समावेश थकबाकीदारांमध्ये होतो. तसेच शेतकऱ्यांनी ते कर्ज भरलं नाही म्हणून पुन्हा कर्ज मिळणार नाही. अशा पद्धतीची शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. मात्र, आम्ही हे सहन करणार नाहीत. येत्या एका आठवड्यात राज्य सरकारने याबाबतची भूमिका जाहीर करावी. अन्यथा महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या तीनही पक्षाच्या मंत्र्यांना आम्ही राज्यात फिरू देणार नाही”, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
Ministers will not be allowed to move around the state, Raju Shetti is aggressive about farmers’ loan waiver
महत्वाच्या बातम्या
- Chief Minister : वैदिक गणितावर आधारित गुणवत्ता केंद्र सुरू करणार , मुख्यमंत्र्यांची माहिती
- Maharashtra भाऊसाहेबांकडचे हेलपाटे वाचले, महाराष्ट्रातील शेतकरी हायटेक झाले, शासनाला ७६ कोटी ८० लाख
- Ashish Shelar लागली बत्ती पार्श्वभागाला की.. आशिष शेलार यांच्यावर टीकेवरून संदीप देशपांडे यांना इशारा
- Kunal Kamra मुंबईत येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने स्वागत करू…राहुल कनाल यांचा कुणाल कामराला इशा