विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर : मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाची संवेदनशीलता पुन्हा एकदा अधाेरेखित झाली आहे. लाल फितीच्या सगळ्या कारभाराला फाटा देऊन एका विद्यार्थ्याला एक लाख रुपयांची तातडीने मदत करण्यात आली.
अहिल्यानगर शहरातील १६ वर्षीय सतीश होडगर हा दहावीत शिकणारा एक हुशार विद्यार्थी दुर्दैवी अपघातात तो गंभीर जखमी झाला. यात त्याच्या उजव्या हाताला मोठी दुखापत झाली आणि डॉक्टरांनी शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय असल्याचं सांगितले.आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सतीशच्या कुटुंबासाठी ही शस्त्रक्रिया परवडणारी नव्हती. सतीश यांना मुख्यमंत्री (Chief Minister) वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडून तातडीने १ लाख रूपयांची आर्थिक मदत करण्यात आली. ही रक्कम एकाच दिवसात रूग्णालयाच्या खात्यात जमा करण्यात आली असल्याने त्याच्या पालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आभार मानले आहेत.
सतीशचे वडील मारूती होडगर यांचा काही वर्षापूर्वी अपघात झाला आणि त्यात त्यांनी उजवा डोळा कायमचा गमावला. दिव्यांग असल्याने त्यांना जड कामाची नोकरी मिळू शकली नाही म्हणून ते एका लहानशा रसवंतीगृहात रोजंदारीवर काम करतात. जिथे त्यांना फक्त ४०० रूपये रोज मिळतो. सतीशची आईही कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मोलमजुरी आणि घरकाम करते. तिला दिवसाला ३०० रूपये मजुरी मिळते. सतीशला २ भावंडे आहेत. मोठी बहीण २० वर्षाची असून लहान भाऊ १२ वर्षाचा आहे. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असून दैनंदिन खर्च भागवणेही मोठं आव्हान आहे.दरम्यान, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत मदत अत्यंत मोलाची ठरते. सतीशच्या बाबतीतही या कक्षाने अवघ्या २४ तासांत आर्थिक मदत मंजूर करून तातडीने रक्कम वर्ग केली अशी माहिती कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे.
Underlining once again the sensitivity of the Chief Minister’s Help Desk, round the clock assistance to the student
महत्वाच्या बातम्या
- Chief Minister : वैदिक गणितावर आधारित गुणवत्ता केंद्र सुरू करणार , मुख्यमंत्र्यांची माहिती
- Maharashtra भाऊसाहेबांकडचे हेलपाटे वाचले, महाराष्ट्रातील शेतकरी हायटेक झाले, शासनाला ७६ कोटी ८० लाख
- Ashish Shelar लागली बत्ती पार्श्वभागाला की.. आशिष शेलार यांच्यावर टीकेवरून संदीप देशपांडे यांना इशारा
- Kunal Kamra मुंबईत येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने स्वागत करू…राहुल कनाल यांचा कुणाल कामराला इशारा