विशेष प्रतिनिधी
मुंबई : Electricity Consumers महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (MERC) महावितरण, टाटा, अदानी आणि बेस्टसह इतर वीज वितरण कंपन्यांचे नवीन वीज दर लागू करण्यास 28 मार्च रोजी मध्यरात्री मंजुरी दिली होती. एक एप्रिलपासून नवीन वीज बिल लागू होणार असल्यामुळे राज्यातील घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक वीजग्राहकांना दिलासा मिळणार होता. मात्र महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशात काही स्पष्ट चुका असल्याचे महावितरणने निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे आता नवीन वीज दरकपातीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.Electricity Consumers
राज्यात एक एप्रिलपासून लागू होणाऱ्या नव्या दरासंदर्भात महावितरणकडून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आली होती. महावितरणचा तोटा वाढत नुकसान आणि ग्राहकांचे देखील हित नसल्याचे याचिकेत म्हटले होते. याचिका दाखल केल्यानंतर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून तत्काळ स्टे ऑर्डर देण्यात आली. यासंदर्भात महावितरणकडून पुनरावलोकन याचिका दाखल करेपर्यंत आता नवीन वीज दरकपातीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता महावितरण एप्रिल महिन्याच्या शेवटी पुनरावलोकन याचिका दाखल करणार आहे.
महावितरणकडून महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आली होती. याचिका दाखल केल्यानंतर एमईआरसीकडून तात्काळ स्टे ऑर्डर देण्यात आली आहे. महावितरणचा तोटा वाढत नुकसान आणि ग्राहकांचे देखील हित नसल्याचं याचिकेत म्हटलं आहे. राज्यात 1 एप्रिलपासून लागू होणाऱ्या नव्या दरासंदर्भात महावितरणकडून याचिका दाखल झाली होती. मात्र, महावितरणकडून पुनरावलोकन याचिका दाखल करेपर्यंत आता स्थगिती देण्यात आली आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटाला पुनरावलोकन याचिका महावितरण दाखल करणार आहे.
याचिकेवर युक्तीवाद करताना महावितरणच्या वकिलांनी सांगितले की, नवीन वीज दर आदेशातील चुका आणि विसंगती वर्ष 2025-26 ते 2029-30 या पाच वर्षांच्या नियामक कालावधीतील वीज दराच्या मूळ स्वरूपावर परिणाम करत आहेत. त्यामुळे नवीन दर लागू केल्यास विविध प्रकारच्या ग्राहकांना आणि वीज वितरण क्षेत्रातील इतर संबंधित घटकांना मोठे व अपरिवर्तनीय नुकसान होऊ शकते. त्यामुळे या आदेशावर तातडीने स्थगिती द्यावी अशी मागणी महावितरणाकडून करण्यात आली होती. तसेच या संदर्भात सविस्तर पुनरावलोकन याचिका एप्रिल 2025 च्या अखेरीस सादर केली जाईल, असे सांगण्यात आले. यानंतर महाराष्ट्र राज्य वीज नियमाक आयोगाने 28 मार्च 2025 रोजी जाहीर केलेल्या नवीन वीज दर आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली. तसेच महावितरणची पुनरावलोकन याचिका दाखल होईपर्यंत 31 मार्च 2023 रोजी जाहीर झालेला आणि 2024-25 या आर्थिक वर्षासाठी लागू असलेला जुना दरच लागू राहील, असे देखील स्पष्ट केले.
Temporary suspension of new electricity rate cuts, shocks electricity consumers
महत्वाच्या बातम्या
- Chief Minister : वैदिक गणितावर आधारित गुणवत्ता केंद्र सुरू करणार , मुख्यमंत्र्यांची माहिती
- Maharashtra भाऊसाहेबांकडचे हेलपाटे वाचले, महाराष्ट्रातील शेतकरी हायटेक झाले, शासनाला ७६ कोटी ८० लाख
- Ashish Shelar लागली बत्ती पार्श्वभागाला की.. आशिष शेलार यांच्यावर टीकेवरून संदीप देशपांडे यांना इशारा
- Kunal Kamra मुंबईत येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने स्वागत करू…राहुल कनाल यांचा कुणाल कामराला इशारा