विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : S. Jaishankar बंगालच्या उपसागराला लागून असलेली सर्वात मोठी किनारपट्टी ही भारताची असल्याचे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बांगलादेशला ठणकावले आहे.S. Jaishankar
बांगलादेशातील हंगामी सरकारचे प्रमुख आणि नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांनी नुकतेच समुद्र किनारपट्टीचे बांगलादेशच मालक असल्याचे म्हटले होते. भारतातील पूर्वेकडील सात राज्ये ही लँड लॉक आहेत, त्यामुळे बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागराचा बांगलादेश संरक्षक असल्याचे त्यांचे म्हणणे होते. नेहमीप्रमाणेच त्यांच्या या विधानाचे पडसाद उमटले होते.
भारताच्या पूर्वेकडील सात राज्ये ही लँड लॉक आहेत. त्यामुळे बंगालचा उपसागर आणि त्याला लागून असलेल्या हिंदी महासागराचा तो एकमेव संरक्षक आहे. असे विधान बांगलादेशचे हंगामी पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी चीन दौऱ्यावर असताना केले होते. याच संदर्भात एस. जयशंकर यांनी हे विधान केले आहे. जयशंकर यांचे हे विधान ही मोहम्मद युनूस यांच्यावर केलेली टीका आहे. युनूस यांनी असे विधान करून पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे.
थायलंडमध्ये सध्या सहावे बिम्सटेक शिखर संमेलन सुरू आहे. तेथे उपस्थितांशी संवाद साधताना जयशंकर म्हणाले की, बंगालच्या उपसागराच्या आसपास आणि जवळच्या देशांमधील समस्या सारख्याच आहेत. यातील काहींचा उगम इतिहासातून होतो. अन्य काही महत्त्वाचे मुद्दे तसेच देशाच्या प्रगतीसाठी त्यांना काही काळ मागे ठेवले होते. भारताला आपल्या मर्यादा, प्राथमिकता आणि जबाबदारीची जाणीव आहे.
बंगालच्या उपसागरात 6500 किमी.ची भारताची सर्वात मोठी किनारपट्टी आहे. या भागात भारताची बिम्स्टेकच्या अन्य पाच सदस्य देशांसोबत सामायिक सीमा आहे. तसेच त्यांच्याशी भारताचे उत्तम संबंध आहेत. यासोबतच भारताचा पूर्वोत्तर भाग हा बिम्स्टेकसाठी एक कनेक्टिव्हिटी हब म्हणून समोर येत आहे. यात रस्ते, रेल्वे, जलमार्ग तसेच पाईपलाईन्सचे मजबूत नेटवर्क आहे. यासोबतच सध्या प्रगतिपथावर असलेले महामार्गाचे काम ईशान्य भारताला प्रशांत महासागराशी जोडेल.
The coast bordering the Bay of Bengal belongs to India, S. Jaishankar assured Bangladesh
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray उध्दव ठाकरे गोंधळलेत, काय बोलावे सुचेना, एकनाथ शिंदे यांचा टोला
- Chandrashekhar Bawankule’ : किती संभ्रमात, एकाकी व खचलेल्या मनस्थितीत, चंद्रशेखर बावनकुळे यांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल
- Praveen Tarde पुणेकरांचा लाडका मुरलीधर, प्रवीण तरडे यांनी केले जिवलग मित्राच्या भाषणाचे कौतुक
- Uddhav Thackeray: तुम्ही बच्चे होता तेव्हा, आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवू नका, उद्धव ठाकरे यांचे प्रत्युत्तर