विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेला प्रकार गंभीर आहे . जे कुणी या घटनेला जबाबदार आहेत, त्यांच्यावर सरकार कठोर कारवाई करणार आहे,” असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
“या प्रकरणात नेमकी काय चूक झाली आहे, याचा सखोल तपास सरकार करणार आहे. संबंधित रुग्णालयाला जिल्हा प्रशासनाकडून अनेक सोयी-सुविधा दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे ही जबाबदारी टाळून कोणी वागलं असेल, तर त्यांना सोडणार नाही. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी केली जाईल.चूक सिद्ध झाली, तर शंभर टक्के कारवाई होणारच,असे त्यांनी सांगितले.
“मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. याप्रकरणी कोणालाही माफ केलं जाणार नाही. महाराष्ट्र सरकार नागरिकांच्या बाजूने ठाम उभी आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
बावनकुळे म्हणाले, “आंदोलन करणं हा नागरिकांचा अधिकार आहे. पण या अधिकारावर गदा आणणे, मुजोरी करणे ही मुघलशाही आहे आणि महाराष्ट्राच्या लोकशाही संस्कृतीला शोभणारी नाही. सर्वसामान्य नागरिकांना उपचार मिळणं हे त्यांचं मूलभूत हक्क आहे. तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.”
यावेळी त्यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्या भेटीबाबतही भाष्य केले. “दोघांची भेट पक्षांतर्गत विषयांवर असू शकते, याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही,” असं स्पष्ट करत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला.
पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केलेला हलगर्जीपणा, योग्य उपचार न दिल्याने 2 जुळ्या मुलींना जन्म दिलेल्या महिलेचा मृत्यू झाला.दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रूग्णालयाने महिलेच्या कुटुंबियांना तातडीने 10 लाख रूपये भरण्यास सांगितले. महिलेच्या कुटुंबाने 3 लाख भरण्याची तयारी दाखवली, पण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवतीला प्रवेश नाकारला. यानंतर गर्भवतीला दुसऱ्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिने दोन मुलींना जन्मही दिला. मात्र यानंतर महिलेला आपला जीव गमवावा लागला. महिलेच्या मृत्यूबाबत राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तनिषा सुशांत भिसे असे मृत्यू झालेल्या गर्भवतीचे नाव आहे. त्यांचे पती सुशांत भिसे हे भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत.
The case at Dinanath Hospital is serious; Action will be taken against those responsible, assures Chandrashekhar Bawankule
महत्वाच्या बातम्या
- Chief Minister : वैदिक गणितावर आधारित गुणवत्ता केंद्र सुरू करणार , मुख्यमंत्र्यांची माहिती
- Maharashtra भाऊसाहेबांकडचे हेलपाटे वाचले, महाराष्ट्रातील शेतकरी हायटेक झाले, शासनाला ७६ कोटी ८० लाख
- Ashish Shelar लागली बत्ती पार्श्वभागाला की.. आशिष शेलार यांच्यावर टीकेवरून संदीप देशपांडे यांना इशारा
- Kunal Kamra मुंबईत येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने स्वागत करू…राहुल कनाल यांचा कुणाल कामराला इशारा