Murlidhar Mohol: मुरलीधर मोहोळ यांच्या तत्परतेमुळे तुर्कीत अडकलेले २६० भारतीय प्रवासी सुखरूप मुंबईत दाखल

Murlidhar Mohol: मुरलीधर मोहोळ यांच्या तत्परतेमुळे तुर्कीत अडकलेले २६० भारतीय प्रवासी सुखरूप मुंबईत दाखल

Murlidhar Mohol

विशेष प्रतिनिधी

Mumbai News: नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे लंडनहून मुंबईकडे येणाऱ्या व्हर्जिन अटलांटिक (VS358) विमानातील २६० भारतीय प्रवाशांचे प्राण वाचले. तुर्कीतील दियाबाकीर लष्करी विमानतळावर तातडीने उतरावे लागलेल्या या विमानाला तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला होता. अनेक अडथळ्यांवर मात करत अखेर हे विशेष विमान शुक्रवारी रात्री ८.३० वाजता मुंबई विमानतळावर सुखरूप उतरले.

विमानातील एका प्रवाशाला उड्डाणादरम्यान वैद्यकीय आपत्कालीन गरज भासल्यामुळे विमानाचे तुर्कीतील लहान आणि लष्करी विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. मात्र, हार्ड लँडिंगमुळे लँडिंग गियरमध्ये बिघाड झाला आणि विमान तिथेच अडकून राहिले. तिथे नागरी सुविधा अत्यल्प असल्यामुळे भारतीय प्रवाशांची अडचण वाढली.



याची माहिती मिळताच राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्वरित हालचाल सुरू केली. त्यांनी हवाई मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, व्हर्जिन अटलांटिक एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि परराष्ट्र मंत्रालय व तुर्कीतील भारतीय दूतावासाशी समन्वय साधून एक विशेष पथक तयार केले.

मोहोळ यांच्या प्रयत्नांमुळे प्रवाशांच्या निवास, भोजन, वैद्यकीय सुविधा यांची तात्काळ व्यवस्था करण्यात आली. गर्भवती महिला आणि लहान मुलांची विशेष काळजी घेतली गेली. तांत्रिक बिघाडामुळे विमान उड्डाण करू शकत नसल्याने नवीन विमान पाठवण्याचा प्रयत्न एअरलाइन्सने केला, मात्र तुर्की लष्कराने परवानगी नाकारली.

या अडचणीतही मोहोळ यांनी हार मानली नाही. त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत तुर्की सरकारकडून प्रवाशांना तीन दिवसांचा ट्रान्झिट व्हिसा मिळवून दिला आणि हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी मिळवून दिली. अखेर, विविध यंत्रणांशी समन्वय साधत व्हर्जिन अटलांटिकचे विशेष विमान तुर्कीवरून उड्डाण करू शकले.

मुंबई विमानतळावर प्रवाशांचे विमान पोहोचल्यावर राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी समाधान व्यक्त करत सांगितले, “प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मी वैयक्तिक लक्ष ठेवून सतत संपर्कात होतो. संकटात अडकलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मदत करणे हे माझे कर्तव्य आहे. सर्व प्रवासी सुखरूप घरी पोहोचल्याने खरोखर समाधान वाटते.”

260 Indian migrants stranded in Turkey safely arrived in Mumbai due to Murlidhar Mohol prompt action

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023