विशेष प्रतिनिधी
Kolhapur News: कॉम्रेड गिरीश फोंडेसारख्या चळवळीतील कार्यकर्त्याला सरकारच्या विरोधात बोलले म्हणून राजकीय दबावापोटी टक्केवारीच्या तुकड्यांवर जगलेल्या महापालिका अधिकाऱ्यांनी सहाय्यक शिक्षण पदावरून तडकाफडकी निलंबित केले. यावरून राज्याच्या राजकारणाची पातळी किती खालच्या दर्जाला गेलीय, हे सामान्य जनतेच्या लक्षात येऊ लागले. राज्यातील राज्यकर्ते षंड झालेत, हे सिद्ध झालेय, असा हल्लाबाेल माजी खासदार राज शेट्टी (Raju Shetti) यांनी केली आहे.
कोल्हापूर महापालिका प्राथमिक शिक्षण समितीतील सहायक शिक्षक गिरीश आनंद फोंडे यांना एकनाथ शिंदेंबद्दल केलेल्या विधानावरून निलंबित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा विरोध असेल, तर शक्तीपीठ महामार्ग होणार नाही,’ अशी भूमिका तल्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. पण, बहुमताने सरकार येताच शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचे काम महायुतीकडून सुरू आहे. यापार्श्वभूमीवर गिरीश फोंडेनी शिंदेंच्या दौऱ्याला कडाडून विरोध केला होता. गिरीश फोडेंनी कॉमेडीयन कुणाल कामराने उदाहरण देत म्हटलेले, “एखादा व्यंग करणारा यांना एवढा झोंबत आहे. संपूर्ण पोलीस यंत्रणा मागे लावली आहे. आम्ही आंदोलन करत असल्याने आमच्याही मागे पोलीस यंत्रणा लावली. पण, आम्ही यांना भीक घालत नाही. कुणाल कामराचे गाणे, तर आम्हाला छान वाटले, शब्द अन् शब्द त्यातील आवडला. आता त्यात आम्ही शेतकऱ्यांचे शब्द घालून सांगणार आहोत. ते गाणे आम्ही तुमच्यासमोर म्हणणार आहोत. तुम्ही काय मागे लावायचे, लावा. राज्यघटनेने आम्हाला अभिव्यक्ती दिली आहे.
“यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात राज्यकर्ते, अशा पद्धतीने चळवळी संपवण्यासाठी कितीही जोमाने केले तरी, त्याच जोमाने आम्ही लढत राहू. पण, राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे, सत्तेच्या जीवावर अतिरेक करून तुम्ही, ज्या भानगडी आणि कारनामे करताय, हे जनतेला माहिती आहे. शक्तीपीठ महामार्गातून किमान 50 हजार कोटी हाणायचा तुमचा डाव आहे. जेव्हा, तुमची सत्ता जाईल, तेव्हा ही जनता तुम्हाला भर चौकात पायाखाली तुडवायला मागे पुढे बघणार नाही,” असा इशारा राजू शेट्टींनी दिला.
Raju Shetti angry over Girish Phonde’s suspension as state rulers clash
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis जीडीपी 300 बिलियन डॉलर पर्यंत नेण्यासाठी एमएमआर ग्रोथ हब महत्त्वाचे, प्रकल्पांची कामे वेगाने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
- Harshvardhan Sapkal : सरकारने इंधनावर लावलेले कर आणि सेस यासंदर्भात श्वेतपत्रिका काढावी, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- Supriya Sule : महिलेचा मृत्यू नसून हत्या, डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा, सुप्रिया सुळे यांची मागणी
- Dr. Sushrut Ghaisas तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा