Chandrakant Khaire : चर्चा शिवसेना ठाकरे गट टिकताेय की नाही याची अन् चंद्रकांत खैरे म्हणतात… आदित्य ठाकरे हाेणार २०२९ मध्ये मुख्यमंत्री

Chandrakant Khaire : चर्चा शिवसेना ठाकरे गट टिकताेय की नाही याची अन् चंद्रकांत खैरे म्हणतात… आदित्य ठाकरे हाेणार २०२९ मध्ये मुख्यमंत्री

Chandrakant Khaire

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : Chandrakant Khaire शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर ठाकरे गटाची अवस्था वाईट झाली आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाची पूर्णत: वाताहत झाली. त्यानंतरही पक्षातून आऊटगोईंग सुरू आहे. तरीही माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी २०२९ मध्ये आदित्य ठाकरे मुख्यमंत्री हाेणार असा आशावाद व्यक्त केला आहे.Chandrakant Khaire

उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुढील निवडणुकीपर्यंत राहत नाही, असा दावा भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. शिवसेनेचे ( ठाकरे गट ) ज्येष्ठ नेते, चंद्रकांत खैरे याला उत्तर देताना म्हणाले, 2029 मध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखील निवडणुका होतील आणि ते मुख्यमंत्री बनतील. भाजपचे स्थानिक मंत्री दानवेंना विचारत नाहीत. बळजबरीने त्यांनी घुसखोरी केली आहे. बाकी काही त्यांचे आता राहिलेले नाही.

चंद्रकांत खैरे म्हणाले, “रावसाहेब दानवे हे विचित्र माणूस आहेत. ते म्हणतात, ‘आम्ही काँग्रेससोबत गेलो.’ पण, बाळासाहेब ठाकरे यांची कडवट शिवसेना, उद्धव ठाकरे आता पुढे घेऊन जात आहेत. आमच्यासारख्या कडवट शिवसैनिकांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे जोमाने काम करत आहेत. 2019 च्या निवडणुकीत रावसाहेब दानवेंनी आमच्या काही लोकांना पैसे वाटले. त्यांच्या पक्षातीलही काही जणांना पैसे वाटले आणि माझा पराभव केला. हाच तुमचा प्रामणिकपणा आहे का?”

खैरे म्हणाले, मी अजूनही त्या माणसाचे तोंड पाहिलेले नाही. मी त्या माणसाशी बोलतही नाही. त्यांनी युतीचा खासदार पाडला. आता परमेश्वराने या निवडणुकीत त्यांना दाखवून दिले. बदला निघतो, बदला थांबत नाही. भाजपच्या पक्ष शिस्तीत एका घराच एकच तिकीट आहे. मात्र, यांनी दोन तिकीटे पदरात पाडून घेतली. शिंदे गटातून मुलीला उभे केले. तरी त्यांची युतीच आहे ना? परंतु पुढे शिवसेनाच तेथून निवडून येणार आहे. तुम्ही 2029 च्या निवडणुकीत काय होते ते पाहा. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणुका होतील आणि ते मुख्यमंत्री बनतील.

Discussion on Shiv Sena Thackeray group survives or not and Chandrakant Khaire says… Aditya Thackeray will be Chief Minister in 2029

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023