विशेष प्रतिनिधी
Pune News : तनिषा भिसे यांना रुग्णालयात उपचारासाठी डिपाॅझिट मागितले नसल्याचा दावा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या (Deenanath Mangeshkar Hospital) वतीने सातत्याने करण्यात येत हाेता. मात्र, स्वत: डाॅ. धनंजय केळकर यांनी याच्यावर खुलासा करत खंत व्यक्त केली आहे. त्यादिवशी कोणत्या कारणाने राहू-केतू काय डोक्यात मध्ये आला, डॉ.सुश्रुत घैसास यांनी अंदाजपत्रकातील चौकोनात १० लाखांचं डिपॉझिट लिहिलं. ही गोष्ट खरी आहे, अशी कबुली दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डाॅ. धनंजय केळकर यांनी दिली.
आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचं प्रसुतीदरम्यान निधन झालं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने १० लाख रुपये अनामत रक्कम भरण्यास सांगितल्याने भिसे कुटुंबियांना दुसऱ्या रुग्णालयात जावं लागलं. या प्रकरणामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची सर्वत्र टीका होत असताना रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र, माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे न देताच त्यांनी पत्रकार परिषद गुंडाळली.
भिसे कुटुंबियांना अनामत रक्कम भरण्यास सांगण्यात आले होते का? डॉक्टर अशा पद्धतीने डिपॉझिट भरण्यास सांगू शकतात का? असे प्रश्न डॉ. धनंजय केळकर यांना विचारण्यात आले होते. त्यावर ते म्हणाले, “आमच्याकडे डॉक्टर कोणत्याही रुग्णाकडून डिपॉझिट मागत नाहीत. कारण तशी पद्धतच आमच्याकडे नाही. रुग्णालयाकडून खर्चाचे अंदाजपत्रक प्रत्येक रुग्णाला दिलं जातं. त्यावरही डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही. त्यादिवशी कोणत्या कारणाने राहू-केतू काय डोक्यात मध्ये आला, डॉ. घैसास यांनी चौकोनात १० लाखांचं डिपॉझिट लिहिलं. ही गोष्ट खरी आहे. पण उपस्थित डॉक्टरांपैकी तुम्ही कोणालाही विचारू शकता, डॉक्टरांकडून अनामत रक्कम मागितली जात नाही. आजवर मी अगणित शस्त्रक्रिया केल्या आहेत, पण आतापर्यंत कोणालाही असं लिहून दिलं नाही.
डॉ. सुश्रूत घैसास हे या रुग्णालयाचे मानद प्रसुती व स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. ते रुग्णालयाचे कर्मचारी नसून ते गेले १० वर्षे कन्सल्टन्ट म्हणून काम करतात. त्यांनी राजीनामा दिला आहे. गेले काही दिवस ते सामाजिक दडपणाखाली वावरत आहेत, धमक्यांचे फोन, समाजमाध्यमांवर होणारी कठोर टीका आणि सामाजिक संघर्षामुळे होणारे वातावरण त्यांच्या सहन करण्याच्या पलीकडे आहे. त्याचा आताच्या रुग्णांच्यावर उपचारांवर परिणाम होईल अशी भीती वाटत आहे. यामुळे त्यांच्या वैद्यकीय विषयावर पुरेशा प्रमाणावर लक्ष केंद्रीत करू शकत नाहीत, रात्रीही झोपू शकत नाहीत. त्यामुळे इतर रुग्णांवर अन्याय होण्यापेक्षा आणि कुटुंबाच्या संरक्षणाकरता त्यांनी दीनानाथ रुग्णालयातील पदाचा राजीनामा दिला आहे. ते फक्त इथेच काम करतात”, असंही डॉ. केळकर म्हणाले.
महानगरपालिकेचे एकही रुपये थकवले नाहीत. एकही रुपयाचा टॅक्स थकलेला नसून आम्ही थेट कोर्टात टॅक्स भरतो. टॅक्स आकारणीची प्रथा कर्मिशिअल केली, त्याविरोधात आम्ही कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टाने दिलेल्या निकालानुसार आम्ही कोर्टात टॅक्स भरतो, असे डाॅ. केळकर यांनी सांगितले.
तनिषा भिसे यांच्या मृत्यूबाबत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने अंतर्गत चाैकशी करून अहवाल दिला आहे. यामध्ये भिसे यांच्या जुन्या आजाराबाबत माहिती दिल्याने रुग्णालयावर टीका हाेत आहे. याबाबत डाॅ. केळकर म्हणाले, माध्यमांना जो अहवाल दिला, त्यामध्ये रुग्णाची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अहवाल शासनाला पाठवला आहे. माध्यमांना जी माहिती दिली तो घटनाक्रम सांगितलेला आहे. आता मेडिकल उपचार काय केले हे शासनाच्या अहवालात आहे. पूर्वीचे काय आजार आहेत ते सांगितलेलं नाही
On that day Rahu-Ketu entered the head? Deenanath Mangeshkar Hospital admits that Dr. Sushrut Ghaissas wrote a deposit of 10 lakhs
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis जीडीपी 300 बिलियन डॉलर पर्यंत नेण्यासाठी एमएमआर ग्रोथ हब महत्त्वाचे, प्रकल्पांची कामे वेगाने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
- Harshvardhan Sapkal : सरकारने इंधनावर लावलेले कर आणि सेस यासंदर्भात श्वेतपत्रिका काढावी, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- Supriya Sule : महिलेचा मृत्यू नसून हत्या, डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा, सुप्रिया सुळे यांची मागणी
- Dr. Sushrut Ghaisas तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा