विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडेबोल सुनावले . यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी माणिकराव कोकाटे आता तरी शहाणपणाने वागण्याचा सल्ला दिला आहे. तसेच अजित पवारांनी अशा लोकांना मंत्रिमंडळात कशाला घेतले, असाही सवाल राष्ट्रवादी काँग्रेसला केला आहे.
कर्जमाफीच्या मुद्यावरुन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडे आणि लग्न करतात. हे पैसे शेतीमध्ये गुंतवत नाही, असे माणिकराव कोकाटे म्हणाले होते. तर लाडकी बहिण योजनेमुळे इतर योजनांवर भार येत असल्याचेही वक्तव्य त्यांनी केले होते. असे वक्तव्य करणारे कोकाटे हे मंगळवारी पक्षाच्या बैठकीला उशिरा पोहचले, त्यामुळे पक्षाध्यक्ष अजित पवारांनी त्यांना चांगलेच झापल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे. त्यावर राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अशा माणसाला मंत्रिमंडळातच कशालं घेतलं…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले की, माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांची तुलना जेव्हा भिकाऱ्यांसोबत केली तेव्हाच अजित पवारांनी हे करायला पाहिजे होते. खरंतर अजित पवारांनी अशा माणसाला मंत्रिमंडळातच घ्यायला नको होतं. यांना मंत्रिमंडळात कशाला घेतलं तेच कळत नाही. अजित पवारांनी झापल्यानंतर आतातरी कोकाटेंनी शहाणपणानं वागावं, अन्यथा शेतकरी आता गप्प बसणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी कृषिमंत्री कोकाटेंना दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शक्तिपीठ महामार्गाला विरोध आहे. कोल्हापूरकरांचाही या मार्गाला विरोध होत आहे. शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, शक्तिपीठ मार्गासाठी अवास्तव खर्च दाखवला जात आहे. यामुळे येथे भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गासाठी 86 हजार कोटी रुपये प्रस्तावित खर्च दाखविला आहे. वास्तविक या मार्गासाठी 28 हजार कोटी खर्च होतील असे सांगितले गेले होते. मग 86 हजार कोटी खर्च करुन 50 हजार कोटींचा भ्रष्टाचार होणार अशी शंका राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.
Act wisely now, advises Raju Shetty to Manikrao Kokate
महत्वाच्या बातम्या
- Chief Minister : वैदिक गणितावर आधारित गुणवत्ता केंद्र सुरू करणार , मुख्यमंत्र्यांची माहिती
- Maharashtra भाऊसाहेबांकडचे हेलपाटे वाचले, महाराष्ट्रातील शेतकरी हायटेक झाले, शासनाला ७६ कोटी ८० लाख
- Ashish Shelar लागली बत्ती पार्श्वभागाला की.. आशिष शेलार यांच्यावर टीकेवरून संदीप देशपांडे यांना इशारा
- Kunal Kamra मुंबईत येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने स्वागत करू…राहुल कनाल यांचा कुणाल कामराला इशारा