Pratap Sarnaik : एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती

Pratap Sarnaik : एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती

Pratap Sarnaik

विशेष प्रतिनिधी

Mumbai News: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी गृह विभागाने राजपत्र प्रकाशित करत पुढील आदेशापर्यंत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांची नियुक्ती केली होती. आता गृहविभागाने आपला निर्णय मागे घेतला असून आहे.

महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची “लोकवाहिनी” असलेल्या एसटीला भविष्यात आर्थिक दृष्ट्या सक्षम करून एक चांगली दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आपल्याला या पदावर नियुक्त करून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सप्टेंबर 2024 मध्ये भरत गोगावले मंत्रिपदापासून वंचित राहिल्याने असलेली नाराजी दूर करण्यासाठी तत्कालीन शिंदे सरकारने त्यांना एसटी महामंडळाचे अध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला होता. विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचे बहुमताने सरकार आल्यानंतर भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी विभागाचे मंत्रिपद देण्यात आले होते. त्यामुळे एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणीही नव्हते. त्यामुळे परिवहन मंत्री या नात्याने शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक हे काही काळ एसटी महामंडळाचे अध्यक्षपद भूषवत होते. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एसटी महामंडळात नवीन अध्यक्षाची त्वरित नियुक्ती करण्याची विनंती केली होती.

2014 ते 2019 या काळात परिवहन मंत्र्यांकडेच एसटी महामंडळाचे अध्यक्षपद होते. त्यामुळे एसटी महामंडळाचे अध्यक्षपद आपल्याकडे येईल, अशी अपेक्षा प्रताप सरनाईक यांना होती. मात्र एसटीच्या अध्यक्षपदी अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांची नियुक्ती केली होती. यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे फक्त नावापुरतेच परिवहन खातं राहणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली. मात्र आता गृहविभागाने आपला निर्णय मागे घेत एसटी महामंडळावर अधिकृतपणे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

Transport Minister Pratap Sarnaik appointed as the Chairman of ST Corporation

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023