विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात ठाकरे यांच्या पक्षात खैरे आणि दानवे आणि वरदेखील ते बाप-लेक दोघेच राहणार आहेत.चंद्रकांत खैरे ढोंगी माणूस असून आता त्यांनी नातवंडं सांभाळावीत अशी टीका खासदार संदीपान भुमरे यांनी शिवसेना ठाकरे गटावर केली.
छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना भुमरे म्हणाले, शहराला लवकरच पाणीपुरवठा सुरू होणार आहे, त्यामुळे या कामाचं श्रेय घेण्यासाठाची आदित्य ठाकरे आणि त्यांचा शिवसेना पक्ष आंदोलन करत आहेत. चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्रिपदावर उद्धव ठाकरे होते. त्यांनी लक्ष घातले नाही, त्यामुळे पाणीपुरवठ्याची योजना पूर्ण झाली नाही. उद्धव ठाकरे यांच्या काळात योजना पूर्ण झाली नाही म्हणून लोकांचे हाल झाले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगरला पाणीपुरठवा करणाऱ्या योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला. चंद्रकांत खैरे हा ढोंगी माणूस आहे. खैरे यांनी सगळ्या योजनेचा बट्ट्याबोळ केला. खैरे यांच्यामुळेच शहराला पाणी मिळाले नाही. खैरे यांनी आता त्यांची नातवंडं सांभाळावीत, अशी टीकाही भूमरे यांनी केली.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर टीका करताना भुमरे म्हणाले, अंबादास दानवे यांना आम्ही दाखवून दिले. त्यांचा जिल्ह्यात एकही आमदार निवडून आला नाही. अंबादास दानवे हे कागदोपत्री नेते आहेत. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी जिल्ह्याची वाट लावली. आता या जिल्ह्यात ठाकरे यांच्या पक्षात खैरे आणि दानवे हे दोघेच राहणार आहेत आणि वरदेखील ते बाप-लोक दोघेच राहणार आहेत. त्यांनी जिल्ह्यात चांगलं काम केलं असतं तर लोकांनी निवडून दिलं नसतं का?
अजित पवार यांच्याकडून निधी मिळत नसल्याच्या आरोपावर भुमरे म्हणाले, एकनाथ शिंदे यांना दिल्ली दरबारी खूप मानलं जातं. संजय राऊत यांना काही काम नाही. संजय राऊत यांच्यासारखे अनेकजण शिंदे साहेबांनी वाटेला लावले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या कुठल्याही फाईली अडवल्या जात नाहीत.
Chandrakant Khaire is a hypocrite, now he should take care of his grandchildren, says Sandipan Bhumre
महत्वाच्या बातम्या