विशेष प्रतिनिधी
माळशिरस: सहकार वाचवण्याचे तत्वज्ञान सांगतात. पण, मोहिते पाटलांनी माळशिरस तालुक्यातील सूतगिरणी, कुक्कुटपालन अशा संस्था खानदानी समजून विकून खाल्ल्या, असा हल्लाबोल माळशिरसचे भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी केला आहे.
माळशिरसमध्ये आप्पासाहेब देशमुख यांनी जयकुमार गोरे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी धैर्यशील मोहिते पाटलांवर टीका करताना सातपुते म्हणाले, मी लढणारा कार्यकर्ता आहे. पण तितकाच भाग्यवान देखील आहे. एका रिंगमध्ये फडणवीससाहेब माझा फोन उचलतात. हे शक्य केवळ आपण भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्यानेच झाले.
माढा लोकसभा मतदार संघाची अवस्था पावसात हल्या धुतल्यासारखी झाली आहे. आ पण आम्ही रगेल कार्यकर्ते या मतदारसंघात परिवर्तन घडवून आणू. असा विश्वासराम सातपुते यांनी व्यक्त केला.
सातपुते म्हणाले, मोहिते पाटील सध्या करमाळा तालुक्यात लागलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जाऊन प्रचार करतात आणि सहकार वाचवण्याचे तत्वज्ञान सांगतात. पण, मोहिते पाटलांनी माळशिरस तालुक्यातील सूतगिरणी, कुक्कुटपालन अशा संस्था खानदानी समजून विकून खाल्ल्या. मात्र या शेतकऱ्याच्या संस्था होत्या. कारखान्यामध्ये शेतकऱ्यांनी शेअर घेतले. मात्र हे लुटून खायचे काम यांनी केले.
विकृत मनोवृत्तीच्या विरोधात राम सातपुते माळशिरसमध्ये पाय रोवून उभा आहे, असे सांगत एकदा राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांना इशारा दिला.
Mohite Patil sold the institution considering it to be aristocracy, Ram Satpute’s attack
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis शेतकऱ्यांना पुढील वर्षीपर्यंत १२ तास मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- Sanjana Ghadi : शिवसेना ठाकरे गट ठराविक गटाच्या ताब्यात; संजना घाडींचा उध्दव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करताना टोला
- लाडक्या बहिणींमुळे निवडून आलो, गुलाबराव पाटील म्हणाले मला गॅरंटी नव्हती
- चंद्रकांत खैरे ढोंगी माणूस, आता त्यांनी नातवंडं सांभाळावीत, संदीपान भुमरे यांची टीका