विशेष प्रतिनिधी
मुंबई – Eknath Khadse पत्रकार अनिल थत्ते यांच्या मुलाखतीचा आधार घेत गिरीश महाजन यांच्यावर महिला सनदी अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार एकनाथ खडसे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाजन यांनी खडसे आणि थत्ते यांच्यावर अब्रूनुकसानीची नोटीस पाठवत आता थेट कायदेशीर लढाईची तयारी दर्शवली आहे.Eknath Khadse
काही दिवसांपूर्वी पत्रकार अनिल थत्ते यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता, ज्यात गिरीश महाजन यांनी एका महिला अधिकाऱ्याला एका रात्री शंभरहून अधिक वेळा फोन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणावर एकनाथ खडसेंनीही महाजनांवर टीका केली होती.
या आरोपांना सडेतोड उत्तर देताना महाजन यांनी दोघांनाही अब्रूनुकसानीची नोटीस बजावली आहे. “माझ्यावर अशा प्रकारचे निराधार आरोप केल्याने माझ्या प्रतिमेला गंभीर धक्का बसला आहे. म्हणूनच मी माझ्या वकिलामार्फत मुंबईतून ही नोटीस पाठवली आहे,” असे महाजन यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “या प्रकरणामुळे मला मानसिक त्रास झाला असून माझी बदनामीही झाली आहे. त्यामुळे आरोप करणाऱ्यांनी खुली माफी मागावी किंवा पुरावे सादर करावेत, अन्यथा आता त्यांना थेट कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.”
Eknath Khadse will face a heavy price for his outrageous allegations; Girish Mahajan will take him to court
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis शेतकऱ्यांना पुढील वर्षीपर्यंत १२ तास मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- Sanjana Ghadi : शिवसेना ठाकरे गट ठराविक गटाच्या ताब्यात; संजना घाडींचा उध्दव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करताना टोला
- लाडक्या बहिणींमुळे निवडून आलो, गुलाबराव पाटील म्हणाले मला गॅरंटी नव्हती
- चंद्रकांत खैरे ढोंगी माणूस, आता त्यांनी नातवंडं सांभाळावीत, संदीपान भुमरे यांची टीका