विशेष प्रतिनिधी
मुंबई: Vanchit Bahujan Aghadi शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) च्या मुखपत्र ‘सामना’मध्ये १४ एप्रिल रोजी प्रकाशित अग्रलेखात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर केलेल्या टीकेला वंचित बहुजन आघाडीने तीव्र टीका केली आहे. टीका करण्यापूर्वी शिवसेनेने स्वतःचे चारित्र्य तपासावे, असा सल्ला दिला आहे.Vanchit Bahujan Aghadi
पक्षाचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी या टीकेला उत्तर देताना बाळासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक आणि राजकीय लढ्यांचे उदाहरण देत शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सिद्धार्थ मोकळे यांनी स्पष्ट केले की, फुले चित्रपटावर ब्राह्मण संघटनांकडून विरोध झाल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते होते ज्यांनी या चित्रपटाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाला विरोध करत चित्रपटातील महत्त्वाच्या दृश्यांच्या कापणीविरोधात ठाम भूमिका घेतली. या संघर्षात महाविकास आघाडीतील कोणताही पक्ष सहभागी झाला नव्हता.
मोकळे यांनी शिवसेनेच्या इतिहासावर प्रकाश टाकताना म्हटले की, शिवसेना २५ वर्षे भाजपसोबत युतीत होती आणि गोध्रा हत्याकांडाच्या वेळी भाजप व नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभी राहिली होती. अशा पक्षाने बाळासाहेब आंबेडकरांसारख्या नेत्यावर टीका करणे हे हास्यास्पद आहे. त्यांनी शिवसेनेला स्वतःचा राजकीय इतिहास तपासण्याचा सल्ला दिला.
बाळासाहेब आंबेडकर हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात न्यायालयीन, राजकीय आणि सामाजिक स्तरावर लढा देत आहेत. संध्याकाळी सहानंतर झालेल्या मतदानाच्या विरोधात त्यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात न्यायालयीन लढाई सुरू केली आहे. महाराष्ट्रात सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाच्या पोलीस कोठडीत झालेल्या हत्येविरोधात त्यांनी रस्त्यावर उतरून आणि न्यायालयात महाराष्ट्रातील भाजप सरकारच्या विरोधात लढा दिला आहे. तसेच, बिहार मधील महायुती सरकारच्या विरोधात महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात यावा यासाठीही त्यांनी लढा दिला आहे.
वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले की, बाळासाहेब आंबेडकर हे जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारे नेते आहेत. त्यांच्यावर कितीही टीका केली गेली तरी ती सूर्यावर थुंकण्यासारखी आहे. त्यामुळे स्वतःचे चेहरे रंगवून घेणे आता थांबवा. बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका करण्यापूर्वी स्वतःच्या भूमिकेचा पुनर्विचार करावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केले आहे.
Vanchit Bahujan Aghadi’s strong response to criticism in Samaan editorial
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis शेतकऱ्यांना पुढील वर्षीपर्यंत १२ तास मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- Sanjana Ghadi : शिवसेना ठाकरे गट ठराविक गटाच्या ताब्यात; संजना घाडींचा उध्दव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करताना टोला
- लाडक्या बहिणींमुळे निवडून आलो, गुलाबराव पाटील म्हणाले मला गॅरंटी नव्हती
- चंद्रकांत खैरे ढोंगी माणूस, आता त्यांनी नातवंडं सांभाळावीत, संदीपान भुमरे यांची टीका