विशेष प्रतिनिधी
मुंबई : घरात बसून कुणालाही निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यासाठी काम करणारे लोक हवेत आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी काम करत नाही, तर नेहमीच काम करत असतो असा टाेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बाेलताना लगावला.Eknath Shinde
शिंदे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. माहीम विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंचा पराभव झाला होता. शिंदे यांचे उमेदवार सदा सरवणकर यांनी माघार घेतली नसल्याने या ठिकाणी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचा उमेदवार निवडून आला. त्यानंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये राजकीय दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर आजही भेट ही महत्त्वाची आहे.
ही पूर्णपणे सदिच्छा भेट हाेती. बाळासाहेबांच्या आठवणीने आम्ही पुन्हा जुन्या आठवणीत रमलो असे सांगून एकनाथ शिंदे म्हणाले, सध्या निवडणुका नसल्याने त्यावर कोणतीही चर्चा करण्याची शक्यता नाही. गेल्या काही दिवसांपासून, विधानसभा निवडणूक झाल्यापासून भेटण्याची, गप्पा मारण्याची दोघांचीही इच्छा होती. आज बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. आम्ही एकत्र काम केलं आहे. त्यामुळे जुन्या गोष्टींवर चर्चा झाली. ही सदिच्छा भेट होती. त्यामुळे राजकीय अर्थ काढण्याची कोणतीही आवश्यकता नाही.
एकनाथ शिंदे म्हणाले की, “मुंबईमधील सिमेंटच्या रस्त्यांची मी पाहणी केली. त्यावर राज ठाकरेंशी चर्चा झाली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा न होता मुंबईतील विकासकामांवर चर्चा झाली.”
राज्याचे मंत्री उदय सामंत म्हणाले की, “एकनाथ शिंदे जर राज ठाकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी गेले तर त्याचे राजकीय अर्थ नक्कीच निघतील याची माहिती आहे. पण राज ठाकरे जर आमच्यासोबत आले तर नक्कीच आम्हाला आनंद होईल. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध हे फार जुने आहेत.Eknath Shinde
Elections cannot be won by sitting at home, Eknath Shinde hits out at Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis शेतकऱ्यांना पुढील वर्षीपर्यंत १२ तास मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- Sanjana Ghadi : शिवसेना ठाकरे गट ठराविक गटाच्या ताब्यात; संजना घाडींचा उध्दव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करताना टोला
- लाडक्या बहिणींमुळे निवडून आलो, गुलाबराव पाटील म्हणाले मला गॅरंटी नव्हती
- चंद्रकांत खैरे ढोंगी माणूस, आता त्यांनी नातवंडं सांभाळावीत, संदीपान भुमरे यांची टीका