विशेष प्रतिनिधी
नाशिक : Shiv Sena नाशिक येथे हाेणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्याच्या प्रसिध्दीसाठी दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांची मदत घेण्याची वेळ आली आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे गटाला भाजपला इशारा द्यायचा आहे. पण त्यासाठीही बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील चित्रफित काढावी लागली आहे.Shiv Sena
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १६ एप्रिल रोजी नाशिकच्या दौऱ्यावर जात आहेत. यासंदर्भातील एक टिझर संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट केला आहे. या टिझरमध्ये शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप समाविष्ट करण्यात आली आहे.
क्लिपची सुरूवात नेहमीप्रमाणे बाळासाहेबांच्या जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… जय महाराष्ट्र. या वाक्याने हाेते. येथपर्यंत ठिक आह. पण नंतरचा बाळासाहेबांचा उपयाेग हा केवळ राजकारणासाठी आणि भाजपवर टीका करण्यासाठी वापरला आहे. क्लिपमध्ये पुढे म्हटले आहे की, आज तुफान गर्दी दिसत आहे. अरे, नाशिक म्हटल्यावर गर्दी उसळणारच. नाशिक आणि शिवसेनेचे नाते आहेच आणि ते राहणारच. कमळाबाई म्हणजे ढोंग आहे.
भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काय, देशात कोणी ओळखत नव्हते, तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला. सगळा पैशांचा खेळ. आज हिंदुत्वाचे खरे मारेकरी कोणी असतील, तर ते हेच भाजपावाले. हिंदुत्व ही तुमची काही खासगी मालमत्ता नाही. हिंदू, हिंदूमध्ये भांडणे लावली जात आहेत. जाती, पोटजातीत मारामाऱ्या लावून मजा पाहत आहेत. पण एक गोष्ट ठासून सांगतो, तुमचे शंभर बाप खाली उतरले, तरी शिवसेनेचे अस्तित्व तुम्हाला संपवता येणार नाही,
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनोहर गार्डन येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात उद्धव ठाकरे शहर-जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसमवेत संवाद साधत मार्गदर्शन करणार आहेत.
Even if a hundred of your fathers come down, you will not be able to end the existence of Shiv Sena…
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis शेतकऱ्यांना पुढील वर्षीपर्यंत १२ तास मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- Sanjana Ghadi : शिवसेना ठाकरे गट ठराविक गटाच्या ताब्यात; संजना घाडींचा उध्दव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करताना टोला
- लाडक्या बहिणींमुळे निवडून आलो, गुलाबराव पाटील म्हणाले मला गॅरंटी नव्हती
- चंद्रकांत खैरे ढोंगी माणूस, आता त्यांनी नातवंडं सांभाळावीत, संदीपान भुमरे यांची टीका