विशेष प्रतिनिधी
नाशिक : काठे गल्ली परिसरातील एका अनधिकृत दर्ग्याच्या तोडकामाची कारवाई बुधवारी पहाटेपासून सुरू करण्यात आली. मात्र कारवाईच्या अगोदर रात्रीच्या सुमारास परिसरात तणाव निर्माण झाला आणि जमावाकडून हिंसक आंदोलन करण्यात आले. पोलिसांवर दगडफेक झाली, काही वाहने फोडण्यात आली आणि या दगडफेकीत ३१ पोलीस कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतले असून ५७ संशयित दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितले की, महापालिकेच्या पथकासोबत कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र त्यावेळी जमावाने तीव्र विरोध दर्शवायला सुरुवात केली. दर्ग्याचे ट्रस्टी आणि काही प्रतिष्ठित नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु जमावाने त्यांच्या आणि पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. काही वाहनांचे नुकसानही झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केला.
दरम्यान, वीजपुरवठा खंडित झाल्याचा फायदा घेत जमाव अधिक आक्रमक झाला. परिसरात अफवा पसरल्यामुळे तणाव वाढला. महापालिकेने १ एप्रिल रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकाम हटविण्याची नोटीस बजावली होती. १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता, मात्र तो संपल्यानंतर महापालिकेने कारवाई सुरू केली.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले की, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी आवश्यक ती कारवाई केली. दगडफेकीत तीन पोलीस वाहने फोडण्यात आली असून २१ पोलिसांना दुखापत झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून कारवाई सुरूच आहे.
या आधी २२ फेब्रुवारी रोजीही या ठिकाणी अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. त्यावेळीही परिसरात तणाव निर्माण झाला होता आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संशयितांविरोधात अटकसत्र सुरू केले आहे.
Violence breaks out during demolition of unauthorized dargah in Nashik; 31 police injured
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis शेतकऱ्यांना पुढील वर्षीपर्यंत १२ तास मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- Sanjana Ghadi : शिवसेना ठाकरे गट ठराविक गटाच्या ताब्यात; संजना घाडींचा उध्दव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करताना टोला
- लाडक्या बहिणींमुळे निवडून आलो, गुलाबराव पाटील म्हणाले मला गॅरंटी नव्हती
- चंद्रकांत खैरे ढोंगी माणूस, आता त्यांनी नातवंडं सांभाळावीत, संदीपान भुमरे यांची टीका