विशेष प्रतिनिधी
अमरावती : आमचं सरकार केवळ डबल इंजिन सरकार नाही, तर डबल बूस्टर सरकार आहे. म्हणूनच विकासाचा वेगही डबल आहे. मी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार – तिघं मिळून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करत आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
अमरावती येथे सुरू झालेल्या विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या झाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले, “पूर्वी ही विमानसेवा केवळ व्हीआयपी लोकांसाठी होती. पण आता सामान्य अमरावतीकरांनाही याचा लाभ मिळणार आहे. रेल्वेने अमरावती ते मुंबई हे अंतर कापायला 12 तास लागतात, पण आता विमानातून हे अंतर केवळ पावणे दोन तासात पार होणार आहे. यामुळे नागरिकांचे तब्बल 10 तास वाचणार आहेत.”
“समृद्धी महामार्गामुळे विदर्भ थेट मुंबईशी जोडला गेला आहे. वाढवण बंदर आणि जेएनपीटीशी विदर्भाची जोडणी होत आहे. यामुळे पोर्ट आधारित उद्योग मोठ्या प्रमाणात उभे राहणार आहेत. दावोस येथे झालेल्या बैठकीत विदर्भासाठी तब्बल 7 लाख कोटींचे करार झाले आहेत.
नदीजोड प्रकल्पामुळे सात जिल्ह्यांमध्ये जलसंपत्तीचे नवे पर्व सुरू होईल आणि विदर्भात दुष्काळाचा कायमस्वरूपी अंत होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. “अमरावती विभाग हा आमच्या सरकारच्या प्राधान्यक्रमात आहे,” असं फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं.
ते पुढे म्हणाले, “अकोला आणि यवतमाळ येथील विमानतळांचेही लवकरच विस्तारीकरण होणार आहे. विमानतळ असतील तिथे उद्योगधंदे येतात, आणि विकासाच्या दृष्टीने ही कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे.”
मुख्यमंत्र्यांनी यावेळी अमरावतीत सुरु झालेल्या मेडिकल कॉलेजचा आणि प्रस्तावित आयटी पार्कचा उल्लेख करत सांगितलं की, “आजच्या दिवशी एक फ्लाइट सुरू झाली आहे, पण ही फक्त सुरुवात आहे. लवकरच 3,000 मीटर लांब धावपट्टीसह आधुनिक विमानतळ उभारायचं आमचं उद्दिष्ट आहे, जेणेकरून कोणत्याही मोठ्या विमानाचं अमरावतीत लँडिंग शक्य होईल.”
Our government is not just a double engine, but a double booster, all three are working together to develop the state, asserts the devendra fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis शेतकऱ्यांना पुढील वर्षीपर्यंत १२ तास मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- Sanjana Ghadi : शिवसेना ठाकरे गट ठराविक गटाच्या ताब्यात; संजना घाडींचा उध्दव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करताना टोला
- लाडक्या बहिणींमुळे निवडून आलो, गुलाबराव पाटील म्हणाले मला गॅरंटी नव्हती
- चंद्रकांत खैरे ढोंगी माणूस, आता त्यांनी नातवंडं सांभाळावीत, संदीपान भुमरे यांची टीका