विशेष प्रतिनिधी
अमरावती: आमची खुर्ची बदलली असली तरी विकासाचे विमान आणि इंजिनही तेच आहे. फक्त आता ते अधिक गतीने धावताना दिसत आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले.
अमरावती विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन झाले.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आमच्या आधीच्या सरकारच्या काळात अनेक प्रकल्प आणि योजना बंद होत्या. मात्र आम्ही सत्तेत आलो आणि राज्याच्या विकासाचं व कल्याणकारी योजनांचं टेकऑफ झालं. मी त्या विमानाचा पायलट होतो. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे माझे को-पायलट होते. पण आता देवेंद्र फडणवीस आमचे पायलट आहेत आणि मी व अजित पवार त्यांच्या विमानाचे को-पायलट आहोत. केवळ आमची खुर्ची बदलली असली तरी विकासाचं विमान आणि इंजिनही तेच आहे. फक्त आता ते अधिक गतीने धावताना दिसतं आहे,
शिंदे म्हणाले की, ज्या भागात चांगली वाहतूक व्यवस्था असते आणि जिथे रेल्वे व विमानसेवा उपलब्ध असते तिथला विकास जलदगतीने होतो. राजाराम महाराजांनी स्थापन केलेल्या कोल्हापूर विमानतळाचा विस्तार आपण केला. त्यामुळे आता ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ होत आहे. अमरावती विदर्भातील शिक्षणाचं माहेरघर आहे. त्यामुळे याठिकाणी विमानसेवा सुरू व्हावी, अशी अमरावतीकरांची मागणी होती. ती मागणी आता आम्ही पूर्ण केली आहे. सध्या मर्यादित विमानफेऱ्या असल्या तरी जसजशी मागणी वाढेल, तसतशी याठिकाणी विमानतळाची क्षमता आणि विमानफेऱ्या वाढवल्या जातील. हे विमानतळ अमरावतीकरांसाठी गेमचेंजर ठरणार आहे.
Even though the chair has changed, the plane and engine of Vikas are the same, asserts Eknath Shinde
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis शेतकऱ्यांना पुढील वर्षीपर्यंत १२ तास मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- Sanjana Ghadi : शिवसेना ठाकरे गट ठराविक गटाच्या ताब्यात; संजना घाडींचा उध्दव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करताना टोला
- लाडक्या बहिणींमुळे निवडून आलो, गुलाबराव पाटील म्हणाले मला गॅरंटी नव्हती
- चंद्रकांत खैरे ढोंगी माणूस, आता त्यांनी नातवंडं सांभाळावीत, संदीपान भुमरे यांची टीका