Kunal Kamra : कुणाल कामराला अटक करता येणार नाही, उच्च न्यायालयाचा दिलासा

Kunal Kamra : कुणाल कामराला अटक करता येणार नाही, उच्च न्यायालयाचा दिलासा

Kunal Kamra

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Kunal Kamra कॉमेडिअन कुणाल कामरा याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. तीन तासांची सुनावणी झाल्यानंतर त्याच्याविरोधातील एफआयआर रद्द करण्याबाबतच्या याचिकेवरील आपला निर्णय राखून ठेवला आहे. तसेच, जोवर यावर निर्णय दिला जात नाही, तोवर कुणाल कामरा यांना अटक करता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.Kunal Kamra

कुणाल कामराच्या वकिलांनी त्याच्याविरोधात करण्यात आलेल्या एफआयआर रद्द केल्या जाव्यात आणि त्याची चौकशी पूर्णपणे थांबवण्याची मागणी केली. कलम 19-ए नुसार हे प्रकरण हास्य अभिनेत्याच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्याशी संबंधित आहे. त्यानुसार कामराकडून काहीही चूक झालेली नाही. यंत्रणांचा वापर करून एखाद्या व्यक्तिला घाबरवायचा आणि त्याचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळेच हे प्रकरण दुर्मिळ आहे.

ज्या व्यक्तीची बदनामी करण्यात आली त्यांनी काहीच तक्रार केली नसल्याचा युक्तिवाद कुणाल कामराच्या वकिलांनी केला. अशा प्रकारे गुन्हे दाखल करणे म्हणजे सत्तेचा दुरुपयोग आहे. उद्धव ठाकरे यांनी 2024 च्या निवडणूक प्रचार मोहिमेत एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटले होते. तेव्हा तर कोणीच एफआयआर केली नाही. पण एका स्टॅण्ड अप कॉमेडिअनने टीका केल्यावर लगेच त्याच्यावर टीका झाली. जर तुम्ही सार्वजनिक जीवनातील व्यक्ती असाल तर तुमच्यावर टीका होणे अपरिहार्य असल्याचे कामराच्या वकिलांचे म्हणणे आहे. तुम्ही कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही.

कुणाल कामरा चौकशीला तयार आहे. मात्र, पोलीस त्याला प्रत्यक्ष हजर राहायला सांगत आहेत. तो प्रत्यक्षात हजर झाला तर त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्याला अनेकांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत, असेही कामराच्या वकिलांनी सांगितले.

यावर सरकारी वकील म्हणाले की, त्याच्या या विनोदामुळे एखाद्या व्यक्तिची प्रतिमा मलीन होते. इतरांनी त्यांना गद्दार म्हटले तर त्यावर कारवाई झाली नाही मग माझ्यावर का होते, हा याचिकाकर्त्याचा सवाल मुळातच चुकीचा असल्याचे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे. तुम्ही एखाद्याला शिवी घालाल आणि मग म्हणाल की, ही कॉमेडी आहे, तर ते योग्य नाही.

कामराला मिळालेल्या धमक्यांवरून न्यायालयाने कामराला तुम्ही सुरक्षा पुरवणार का, अशी विचारणा सरकारी वकिलांना केली. त्यावर सरकारी वकील म्हणाले की, आमच्याकडे तशी विचारणा झाली तर आम्ही ही मागणी नक्की पूर्ण करू. कामरा सध्या जिथे राहतो तिथे जाऊन त्याचा जबाब नोंदवता येईल का, अशी विचारणाही न्यायालयाने केली. यावर सरकारी वकिलांचे म्हणणे होते की, यामुळे चुकीचा रिवाज पडेल. आम्ही परवानगी दिल्यावरही काय अडचण आहे, असा सवाल न्यायालयाने केला. कामरा सध्या तामिळनाडूत असल्याचे सांगितले जाते. आपण या प्रकरणी चेन्नई पोलिसांना मदत करण्यासाठी सांगू शकतो.

कुणाल कामरा याने काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्यातून टीका करत त्यांना गद्दार म्हटले होते. त्याच्या विरोधात अनेक एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी कामराच्या स्टुडिओची तोडफोड देखील केली. त्यानंतर कामराने उच्च न्यायालयात धाव घेतली.

Kunal Kamra cannot be arrested, High Court gives relief

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023