विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Aurangzeb छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या थडग्याच्या मुद्द्याने आता आंतरराष्ट्रीय वळण घेतले असून, खुद्द संयुक्त राष्ट्र महासचिवांकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे. मुघल सम्राट बहादूर शाह झफर यांचे वंशज असल्याचा दावा करणारे याकूब हबीबुद्दीन तुसी यांनी संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस यांना पत्र पाठवून औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण देण्याची मागणी केली आहे.Aurangzeb
तुसी यांनी आपल्या पत्रात म्हटले की, औरंगजेबाचे थडगे हे वक्फ मालमत्तेचा एक भाग असून, ते पुरातत्त्व विभागाच्या 1958 च्या अधिनियमांतर्गत संरक्षित स्मारक आहे. त्यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारचा अनधिकृत हस्तक्षेप, बदल किंवा नुकसान करणे हे बेकायदेशीर ठरेल. त्यांनी या स्मारकाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार संपूर्ण संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
17 मार्च रोजी नागपूरमध्ये एका रॅलीदरम्यान औरंगजेबाच्या थडग्याविरोधात घोषणाबाजी झाल्यानंतर दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला होता. अफवांच्या पार्श्वभूमीवर हिंसाचार भडकला आणि पोलिसांवर दगडफेक झाली. या प्रकरणात आतापर्यंत 92 जणांना अटक करण्यात आली आहे.
तुसी यांनी भारत सरकार आणि पुरातत्त्व खात्याला संयुक्त राष्ट्राच्या हस्तक्षेपातून या थडग्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलण्याची मागणी केली आहे. त्यांनी भारताने 1972 च्या युनेस्को सांस्कृतिक वारसा संरक्षण करारावर स्वाक्षरी केलेली असल्याचेही पत्रात नमूद केले आहे, त्यामुळे या स्मारकांचे संरक्षण करणे भारताची आंतरराष्ट्रीय जबाबदारी आहे, असा दावा त्यांनी केला.
या प्रकरणी बोलताना तुसी यांनी ‘छावा’ या आगामी चित्रपटाचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यावरही टीका केली. चित्रपट, माध्यमं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून इतिहासाचे विकृतीकरण करून जनतेच्या भावना भडकवल्या जात असल्याचे ते म्हणाले. त्यामुळेच अशा प्रकारच्या तणावाच्या घटना घडत आहेत, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आणि औरंगजेबाच्या थडग्याला तातडीने सुरक्षा रक्षक द्यावेत, अशी मागणी केली.
औरंगजेब याचे थडगे छत्रपती संभाजीनगरजवळ खुलताबाद येथे असून, ते अतिशय साधे आहे. त्याने स्वतःच्या इच्छेनुसार आपल्या अध्यात्मिक गुरू शेख झैनुद्दीन शिराजी यांच्या दर्ग्याजवळ आपले थडगे असावे अशी इच्छा व्यक्त केली होती आणि त्यानुसारच हे थडगे उभारण्यात आले होते.
Aurangzeb’s Tomb Row Reaches United Nations; Descendant Seeks Global Protection
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : खुर्ची बदलली असली तरी विकासाचे विमान आणि इंजिनही तेच , एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
- Mahagyandeep : देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
- Kalakendra Artists : तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती, आशिष शेलार यांची माहिती
- NCW अध्यक्षा विजयाताई रहाटकर उद्यापासून हिंसाचारग्रस्त बंगाल दौऱ्यावर; मुर्शिदाबाद, मालद्यात जाऊन देणार पीडित कुटुंबीयांना आधार!!