विशेष प्रतिनिधी
नाशिक : Balasaheb उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नाशिकमध्ये 16 एप्रिल रोजी भव्य मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील AI तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आलेले भाषण. दाखविण्यात आले. बाळासाहेबांच्या आवाजाची नक्कल करून तयार करण्यात आलेल्या या AI भाषणावर एकनाथ शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “बाळासाहेबांच्या बनावट आवाजाचा वापर करावा लागतोय, हे दुर्दैवी आहे. कारण त्यांचे खरे विचार आजही आमच्यासोबत आहेत,” अशी टीका करत म्हस्केंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर निशाणा साधला.Balasaheb
“बाळासाहेबांचा आत्मा काय म्हणत असेल?”
नरेश म्हस्के म्हणाले, “ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, ते आज त्यांच्या बनावट आवाजाचा आधार घेत आहेत. हे केवळ राजकीय नौटंकी आहे. बाळासाहेबांच्या आवाजाची नक्कल करत आमच्यावर टीका केली जातेय. त्यांच्या आत्म्याला याचा किती त्रास होत असेल?”
“संकुचित विचारांचा अपमान”
म्हस्केंनी हेही सांगितले की, “उद्धव ठाकरेंचा पक्ष आता अस्तित्वात उरलेला नाही. अनेक नेते आणि कार्यकर्ते त्यांना सोडून गेले आहेत. त्यामुळे जनतेच्या भावना खेचण्यासाठी अशा बनावट क्लिप्सचा आधार घेतला जातोय. हे फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्याच नव्हे, तर त्यांच्या विचारधारेचाही अपमान आहे.”
हिंदुत्वावरून आरोप-प्रत्यारोप
उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपावर सडकून टीका केली होती. त्याला उत्तर देताना म्हस्के म्हणाले, “बाळासाहेबांनी वक्फ कायदा रद्द करण्याची मागणी केली होती. मग मेळावा सभागृहात का घेतला? मैदानावर घ्या ना! सावरकरांचा अपमान कोणी केला? शिवाजी महाराजांचा अनादर कोणी केला? तुमचं हिंदुत्व आता जनतेला समजलंय.”
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांची नक्कल करत, त्यांच्या दाढीचा उल्लेख करून टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना म्हस्के म्हणाले, “दाढी वाढवण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हृदय
Balasaheb’s speech in AI voice at Nashik gathering; Naresh Mhaske attacks Uddhav Thackeray, calling it an insult to Balasaheb
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : खुर्ची बदलली असली तरी विकासाचे विमान आणि इंजिनही तेच , एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
- Mahagyandeep : देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
- Kalakendra Artists : तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती, आशिष शेलार यांची माहिती
- NCW अध्यक्षा विजयाताई रहाटकर उद्यापासून हिंसाचारग्रस्त बंगाल दौऱ्यावर; मुर्शिदाबाद, मालद्यात जाऊन देणार पीडित कुटुंबीयांना आधार!!