Uddhav Thackeray : “मी भाजपला सोडलं, हिंदुत्व नाही”, उद्धव ठाकरेंचा निर्धार मेळाव्यात भाजपवर तीव्र हल्ला

Uddhav Thackeray : “मी भाजपला सोडलं, हिंदुत्व नाही”, उद्धव ठाकरेंचा निर्धार मेळाव्यात भाजपवर तीव्र हल्ला

Uddhav Thackeray

विशेष प्रतिनिधी

नाशिक : Uddhav Thackeray मी भाजपला सोडलं, पण हिंदुत्व नाही. मेलो तरी हिंदुत्व सोडणार नाही. पण मला बुरसटलेलं हिंदुत्व नकोय, आणि ते तुम्हालाही नको असायला हवं, असे म्हणत शिवसेना ठाकरे गट ‘निर्धार मेळाव्यात’ उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. हिंदुत्वाचा राजकीय गैरवापर, वक्फ बोर्ड विधेयक, आणि EVM घोटाळा यावरून ठाकरे यांनी भाजपवर अनेक गंभीर आरोप केले. ते म्हणाले,Uddhav Thackeray

उद्धव ठाकरेंनी म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी ‘हिंदू हिंदू’ म्हणून मतदान करता येतं हे दाखवून दिलं, पण आज भाजप त्याच तत्वज्ञानाचा विकृत वापर करत आहे. त्यांनी भाजपवर आरोप केला की, “हिंदूंना पेटवायचं आणि मुसलमानांवर दगड मारायचा, मग मुसलमानांना भडकवायचं आणि हिंदूंवर दगड मारायचा. दोन समाजांमध्ये फूट पाडून सत्ता भोगण्याचं राजकारण भाजप करत आहे.”

वक्फ बोर्ड विधेयकावर बोलताना उद्धव म्हणाले, “वक्फ बोर्डाच्या कायद्याला विरोध करणाऱ्यांचं हिंदुत्व काय आहे? शाहांसह अनेक भाजप नेत्यांनी या विधेयकावर भाषणं केली, ती दाखवा.”
त्यांनी EVM घोटाळ्यावरही सवाल उपस्थित केला. “मतांचा खेळ सुरू आहे, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राहिलेली नाही,” असंही त्यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, “शिवसेनेने संयुक्त महाराष्ट्र दिनी रक्तदानाचा विश्वविक्रम केला, तर भाजपने बोगस सदस्य नोंदणीचा विक्रम केला. भाजप फेक नरेटिव्ह तयार करून प्रचार करतो, पण आम्ही प्रत्यक्ष काम करतो.

“भाजपचं हिंदुत्व फक्त निवडणुकीपुरतं असतं, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रहितासाठी असतं. जय श्रीराम म्हणताना जय शिवराय म्हणालाच पाहिजे, कारण राम हे आमच्या संस्कृतीचा भाग आहेत आणि त्याबद्दल आम्हाला कोणी शिकवू शकत नाही,” असेही ते म्हणाले.

“महाराष्ट्रात ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि बिहारमध्ये ‘बाटेंगे और जीतेंगे’ म्हणणारे भाजपवाले कुणाचेही नाहीत. मतांसाठी कोणाचाही वापर करतील आणि मग फेकून देतील,” असा आरोप त्यांनी केला.

“I left BJP, not Hindutva”, Uddhav Thackeray’s strong attack on BJP at Nirdhar rally

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023