विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘Phule film फुले’ या चित्रपटावर सध्या निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्या म्हणाल्या की, “चित्रपटाच्या टीमने राज ठाकरे यांची भेट घेतली असून, जर चित्रपटात दाखवलेला इतिहास सत्य व वस्तुनिष्ठ असेल, तर तो कोणत्याही दडपणाला न भिता बिनधास्त प्रदर्शित करावा.”Phule film
शालिनी ठाकरे यांनी सांगितले की, राज ठाकरे यांनी स्वतः फुले चित्रपटाच्या टीमला प्रोत्साहन दिले असून, त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “या चित्रपटात जर खरा इतिहास दाखवला असेल, तर कोणत्याही बदलाची गरज नाही. आणि अशा चित्रपटाला कोणतीही जातीय किनार लावू नका.”
शालिनी ठाकरे पुढे म्हणाल्या, “राज ठाकरे यांनी प्रश्न विचारला आहे की, महापुरुषांना सतत जातीच्या राजकारणात का ओढले जाते? ‘फुले’ हे नाव ऐकले की लगेच वाद निर्माण करणे ही प्रवृत्ती थांबली पाहिजे. फुलेंचा वारसा सर्व समाजासाठी आहे, एखाद्या जातीपुरता नाही.”राज ठाकरे यांचं हेही मत होतं की, “हा चित्रपट फुलेंच्या जयंतीदिनीच प्रदर्शित व्हायला हवा होता, जेणेकरून त्यांना खरी आदरांजली वाहता आली असती. मात्र काही संघटनांनी जातीय प्रश्न उपस्थित करून चित्रपटाच्या प्रदर्शनास अडथळा निर्माण केला, हे दुर्दैवी आहे.”
या चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन यांनी केलं असून, प्रमुख भूमिकेत ‘स्कॅम 1992’ फेम प्रतीक गांधी हे महात्मा जोतिराव फुले यांची भूमिका साकारत आहेत. तर सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत अभिनेत्री पत्रलेखा झळकणार आहे.
शालिनी ठाकरे यांनी स्पष्ट केलं की, “ऐतिहासिक व सामाजिक आशय असलेल्या चित्रपटांना राजकीय किंवा जातीय रंग देणं चुकीचं आहे. अशा कलाकृती समाजप्रबोधनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतात. चित्रपटात जर चुकीचे किंवा अपमानास्पद काही असेल तर त्यावर चर्चा व्हावी, पण आधीच अडथळे निर्माण करणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अपमान आहे.”
If history is shown truthfully, then release it without any hesitation, says Raj Thackeray on Phule film
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : खुर्ची बदलली असली तरी विकासाचे विमान आणि इंजिनही तेच , एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
- Mahagyandeep : देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
- Kalakendra Artists : तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती, आशिष शेलार यांची माहिती
- NCW अध्यक्षा विजयाताई रहाटकर उद्यापासून हिंसाचारग्रस्त बंगाल दौऱ्यावर; मुर्शिदाबाद, मालद्यात जाऊन देणार पीडित कुटुंबीयांना आधार!!