विशेष प्रतिनिधी
नाशिक : Uddhav Thackeray शेतकऱ्यांची चेष्टा चालू आहे. कोकाटे म्हणाले कर्जमाफी कशाला पाहिजे, लग्न करायला का? पण त्यांच्या बापाचे काय जात आहे. आम्ही कर्ज काढतोय, शेती करतोय. तुम्हाला काय करायचे आहे,” असो हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर केला.Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या मेळाव्यात जोरदार भाषण केले. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानावर शेतकऱ्यांनी कर्ज काढलं, तुझ्या बापाचं काय चाललंय? असा सवाल ठाकरेंनी केला.शेतकरी आत्महत्या करतो, त्या घरात कधी मंत्री जातो का? असा प्रश्नही ठाकरेंनी केला.
माझ्या शेतकऱ्यांनाही त्यांनी फसवले. कोकाटे अगोदर बोंबलत होते की 31 मार्चपर्यंत मनो किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जातील. पण पैसे आले का? आज तारीख 16 एप्रिल तारीख आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले का?” असा प्रश्न ठाकरेंनी केला.
भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात काही वचनं दिली होती. थापा मारल्या होत्या. शेतकऱ्यांचे आम्ही कर्ज माफ करू, माताभगिनींना आम्ही 2100 रुपये देऊ असे सांगितले होते. किती रुपये महिलांच्या खात्यावर आले. त्यांनी दणादण घोषणा जाहीर केल्या. पण आता सांगत आहेत, फक्त 500 रुपयेच मिळतील. मग माताभगिनींना फसवून का मते घेतलीत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
What’s they take from your father, Uddhav Thackeray’s attack on Manikrao Kokate
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : खुर्ची बदलली असली तरी विकासाचे विमान आणि इंजिनही तेच , एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
- Mahagyandeep : देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
- Kalakendra Artists : तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती, आशिष शेलार यांची माहिती
- NCW अध्यक्षा विजयाताई रहाटकर उद्यापासून हिंसाचारग्रस्त बंगाल दौऱ्यावर; मुर्शिदाबाद, मालद्यात जाऊन देणार पीडित कुटुंबीयांना आधार!!