विशेष प्रतिनिधी
मुंबई : नाशिकमध्ये झालेल्या ठाकरे गटाच्या निर्धार मेळाव्यात एआयच्या (कृत्रिम बुद्धिमत्तेच्या) साहाय्याने दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील भाषण ऐकविण्यात आले. या प्रकारावर आता शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी या व्हिडिओवर खोचक टीका केली आहे.
शिंदे गटाच्या उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले की, “हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कधीच Artificial नव्हते, ते Original होते. पण हतबल आणि अस्तित्व हरवलेला ठाकरे गट बाळासाहेबांचा आवाज वापरून स्वार्थासाठी एआयची मदत घेत आहे. नाशिकमधील व्हिडीओ हा बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान आहे. या कर्तृत्वहिन बाप बेट्यांना आता स्वतःच्या स्वार्थासाठी AI ची मदत घ्यावी लागतेयं . अरेरे, काय दिवस आलेत उबाठावर.”
या व्हिडीओमध्ये भाजपा आणि शिंदे गटावर टीका करण्यात आली होती. “आपली शिवसेना व्यापाऱ्यांनी तोडली. संभाजी महाराजांसारखेच वार आपल्या नशिबात आले. परंतु घाबरू नका. गद्दारांचे मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत. शिवसेना संपवण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी ती संपणार नाही. तुमचे शंभर बाप खाली आले तरी शिवसेना संपणार नाही,” असे भावनिक आवाहन या भाषणातून करण्यात आले होते.
या संपूर्ण प्रकारामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. एआयच्या माध्यमातून पूर्व नेत्या आणि विचारवंतांच्या आवाजाचा वापर करून राजकीय संदेश पोहोचवण्याच्या पद्धतीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
AI’s help for selfishness… What a day it has come to Ubatha, Sheetal Mhatre’s criticism
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : खुर्ची बदलली असली तरी विकासाचे विमान आणि इंजिनही तेच , एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
- Mahagyandeep : देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
- Kalakendra Artists : तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती, आशिष शेलार यांची माहिती
- NCW अध्यक्षा विजयाताई रहाटकर उद्यापासून हिंसाचारग्रस्त बंगाल दौऱ्यावर; मुर्शिदाबाद, मालद्यात जाऊन देणार पीडित कुटुंबीयांना आधार!!