विशेष प्रतिनिधी
मुंबई : येत्या दोन महिन्यांत रायगड जिल्ह्यात पक्षप्रवेशाचे अनेक कार्यक्रम होतील. जिल्ह्यात भाजपला एक नंबरचा पक्ष बनवू, पण गरज सरो वैद्य मारो असे करू नका असे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आणि अलिबागचे माजी आमदार सुभाष ऊर्फ पंडित पाटील यांनी सांगितले.
पंडित पाटील यांनी बुधवारी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना पंडित पाटील म्हणाले, यापूर्वी पंडित पाटील मुक्त होता’. आता प्रोटोकॉलमध्ये राहावे लागेल. येत्या दोन महिन्यांत रायगड जिल्ह्यात पक्षप्रवेशाचे अनेक कार्यक्रम होतील. जिल्ह्यात भाजपला एक नंबरचा पक्ष बनवू. फक्त ‘गरज सरो वैद्य मरो’, असे होऊ नये.
आता मी बोलू शकतो, असे म्हणत पंडित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाही सुनावले. ते म्हणाले, मागच्या निवडणुकीत तटकरे खासदार झाल्यानंतर ते आम्हाला मदत करतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी स्वभावाप्रमाणे त्यांना मदत करणाऱ्यांकडे लक्ष दिले नाही,
पंडित पाटील यांच्यासोबत अॅड. आस्वाद पाटील, चित्रा आस्वाद पाटील आणि पंडित पाटील यांचे चिरंजीव सवाई पाटील यांनि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत रायगड जिल्हा परिषदेचे सहा माजी सभापती, सात जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा बँकेचे दोन संचालक तसेच आजी-माजी 60 सरपंच यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या मुंबई कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला यावेळी राज्यसभा सदस्य धैर्यशील पाटील, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर आणि विधानसभा सदस्य विक्रांत पाटील, उत्तर रायगडचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आदी उपस्थित होते.
पंडित पाटील हे शेकापचे सरचिटणीस आणि माजी आमदार जयंत पाटील यांचे बंधू आहेत. आस्वाद पाटील हे जयंत पाटील यांचे भाचे म्हणजेच जयंत पाटील यांच्या दिवंगत भगिनी मीनाक्षी पाटील यांचे पुत्र आहेत. त्यामुळे शेकापला केवळ पक्षीय पातळीवरच धक्का बसला आहे असे नाही तर जयंत पाटील यांच्या घरात देखील राजकीय फूट पडली आहे.
विधानसभा निवडणुकीत अॅड. आस्वाद पाटील यांना अलिबागमधून उमेदवारी न देता जयंत पाटील यांनी स्नुषा चित्रलेखा पाटील यांना संधी दिली होती. यामुळे पंडित पाटील आणि आस्वाद पाटील नाराज होते. परिणामी त्यांनी शेकाप उमेदवारांच्या प्रचारातही भाग घेतला नव्हता.
Pandit Patil cautioned BJP at the time of entry
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : खुर्ची बदलली असली तरी विकासाचे विमान आणि इंजिनही तेच , एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
- Mahagyandeep : देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
- Kalakendra Artists : तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती, आशिष शेलार यांची माहिती
- NCW अध्यक्षा विजयाताई रहाटकर उद्यापासून हिंसाचारग्रस्त बंगाल दौऱ्यावर; मुर्शिदाबाद, मालद्यात जाऊन देणार पीडित कुटुंबीयांना आधार!!