विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी आणि गुजराती वाद समोर आला आहे. तुम मराठी लोग गंदा है, मच्छी मटण खाता है, असे सारखे टोमणे मारणाऱ्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे ) कार्यकर्त्यांनी धडा शिकविला.
घाटकोपर पूर्वेला एका सोसायटीमध्ये गुजराती व्यक्तीकडून मराठी कुटुंबाचा अपमान झाल्याचा प्रकार घडल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. मराठी कुटुंबाच्या मांसाहार करण्यावरुन गुजराती व्यक्तीनं मराठी कुटुंबाला त्रास दिल्याचा आरोप केला आहे. “तुम मराठी लोग गंदा है, मच्छी मटण खाता है”, अशा शब्दात गुजराती व्यक्ती मराठी कुटुंबाला टोमणे मारत होता . त्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि सोसायटीच्या सदस्यांना याबाबत जाब विचारला. मनसेनं आपल्या स्टाइलनं सोसायटीच्या अमराठी सदस्यांना घडलेल्या घटनेचा जाब विचारला आणि मराठी माणसाचा अशापद्धतीचे अपमान खपवून घेतला जाणार नाही असाही इशारा दिला.
या सोसायटीमध्ये फक्त ४ मराठी तर इतर सर्व गुजराती कुटुंबे राहतात. त्यामुळे गुजराती व्यक्तींकडून मराठी नागरिकांना त्रास दिला जात असल्याची तक्रार मराठी कुटुंबाने मनसेकडे केली होती. घाटकोपरमधील मनसेचे पदाधिकारी राज पार्टे यांनी सोसायटीमध्ये धाव घेत सोसायटीच्या अमराठी सदस्यांना जाब विचारला .
“सोसायटीमध्ये जरी ४ मराठी कुटुंब राहत असली तरी याठिकाणी जर का मराठीचा मुद्दा आला तर ४ हजार मराठी लोक इथं उभे राहतील आणि धडा शिकवतील, असा इशारा राज पार्टे यांनी दिला.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पुन्हा एकदा मराठी-अमराठी वादाने डोकं वर काढलं आहे. त्यात मनसेनं मराठी भाषेवरुन आक्रमक पवित्रा घेत बँकांमध्ये मराठीचा वापर होते की नाही हे पाहण्यासाठीची मोहिम राबवली होती. बँकांमध्ये धडक देत सर्व कारभार मराठीत उपलब्ध करुन देण्याबाबत मनसैनिकांनी बँक व्यवस्थापकांना निवेदनं दिली होती. तर काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना दम देखील भरला होता.
MNS has taught a lesson to those who call you Marathi people dirty.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : खुर्ची बदलली असली तरी विकासाचे विमान आणि इंजिनही तेच , एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
- Mahagyandeep : देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
- Kalakendra Artists : तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती, आशिष शेलार यांची माहिती
- NCW अध्यक्षा विजयाताई रहाटकर उद्यापासून हिंसाचारग्रस्त बंगाल दौऱ्यावर; मुर्शिदाबाद, मालद्यात जाऊन देणार पीडित कुटुंबीयांना आधार!!