विशेष प्रतिनिधी
चेन्नई : Madras High Court तमिळनाडूचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री के. पोनमुडी यांनी शैव आणि वैष्णव संप्रदायाच्या धार्मिक चिन्हांवर अश्लील आणि अपमानास्पद मजकूरातून विनोद केल्याच्या प्रकरणावर मद्रास उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे.Madras High Court
न्यायमूर्ती एन. आनंद वेंकटेश यांच्या खंडपीठाने पोलिसांना निर्देश दिले आहेत की, २३ एप्रिलपूर्वी पोनमुडी यांच्याविरोधात एफआयआर नोंदवावा. जर आदेशाची अंमलबजावणी झाली नाही, तर न्यायालय स्वतःहून (suo motu) गुन्हा दाखल करेल, असा इशाराही दिला आहे.
ही सुनावणी वकील बी. जगन्नाथ यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने झाली. याचिकाकर्ते जगन्नाथ हे स्वत: वैष्णव संप्रदायाचे अनुयायी असून त्यांनी पोनमुडी यांच्या विधानाला द्वेषमूलक भाषण ठरवले आहे.
पोनमुडी यांनी एका कथित विनोदात सांगितले की, एक व्यक्ती वेश्या कडे गेला असता तिने विचारले की तो शैव आहे की वैष्णव? त्याने न समजल्यावर तिने स्पष्ट केले की “पट्टई” (शैवांचा आडवा तिलक) घालतोस की “नामम्” (वैष्णवांचा उभा तिलक)? नंतर तिने अश्लील संदर्भ देत सांगितले की, शैव असेल तर “झोपून” आणि वैष्णव असेल तर “उभे राहून” अशी स्थिती असेल.
न्यायालयाने नमूद केले की, “जेव्हा सरकार इतरांच्या द्वेषयुक्त भाषणांवर गंभीरपणे कारवाई करते, तेव्हा आपल्या मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यांवरही तितकीच गंभीर कारवाई व्हायला हवी.”
त्याचबरोबर, न्यायालयाने एकाच गुन्ह्यासाठी अनेक एफआयआर दाखल करू नये, असा आदेशही दिला. “एकच एफआयआर नोंदवा आणि त्यावर कारवाई करा. कायदा सर्वांसाठी समान आहे,” असे न्यायमूर्ती वेंकटेश यांनी स्पष्ट केले.
डीएमके पक्षाने या प्रकरणाची दखल घेत, पोनमुडी यांची पक्षाच्या उपमहासचिव पदावरून हकालपट्टी केली आहे. मात्र ते अजूनही राज्याचे मंत्री आहेत. पोनमुडी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे, पण त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया आता सुरु होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणामुळे तमिळनाडूतील राजकारणात खळबळ उडाली असून, धर्मविषयक संवेदनशीलतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Madras High Court orders FIR against DMK Minister Ponmudi for obscene jokes on Hindu religious symbols
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : खुर्ची बदलली असली तरी विकासाचे विमान आणि इंजिनही तेच , एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
- Mahagyandeep : देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
- Kalakendra Artists : तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती, आशिष शेलार यांची माहिती
- NCW अध्यक्षा विजयाताई रहाटकर उद्यापासून हिंसाचारग्रस्त बंगाल दौऱ्यावर; मुर्शिदाबाद, मालद्यात जाऊन देणार पीडित कुटुंबीयांना आधार!!