विशेष प्रतिनिधी
पुणे : खासदार डॉ. मेधा कुलकर्णी (MP Dr. Medha Kulkarni) यांच्यावर अजान रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करून अटकेची मागणीही करण्यात आली आहे. हा वाद हनुमान जयंतीच्या दिवशी पुण्येश्वर मंदिरात झालेल्या कार्यक्रमावेळी उफाळून आला, जेव्हा कुलकर्णी त्या परिसरात होत्या. आरोपानुसार, त्यावेळी जवळील ऐतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्ग्यात सुरू असलेल्या नमाजाच्या अजानला रोखण्याचा त्यांनी प्रयत्न केला, असा दावा दर्गा ट्रस्टने तक्रारीत केला आहे.
डॉ. मेधा कुलकर्णी यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत स्पष्टपणे सांगितले की, “हा सर्व प्रकार माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी रचलेला राजकीय कट आहे. मी कुठेही दर्ग्यात गेले नाही, हे कोणीही सिद्ध करू शकत नाही. माझी गाडी रस्त्यावर उभी होती, आणि मी फक्त अजानचा आवाज थोडा कमी करण्याची विनंती केली, कारण त्यादिवशी आमचा सण होता.”
त्यांनी स्पष्ट केलं की, “१३ एप्रिल रोजी घडलेली घटना आता एवढ्या उशिरा का पुढे आणली जात आहे? यामागे काही ना काही कारण निश्चितच आहे.”
डॉ. कुलकर्णी यांनी पुढे सांगितले की, “हा व्हिडीओ जर आहे तर समोर आणावा. मी कायद्यात विश्वास ठेवते आणि या प्रकरणात कायदेशीर लढाई लढणार आहे. माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत आणि त्यामुळे मला असुरक्षित वाटते, म्हणूनच मी पोलिसांकडे माझ्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे.”
दर्गा ट्रस्टने दिलेल्या तक्रारीनंतर स्थानिक पोलीस तपास करत असून, याप्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, डॉ. कुलकर्णी यांनी जोरदार बचाव करत स्पष्ट केले आहे की, “ज्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत, त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे. मी कोणत्याही धार्मिक स्थळी जाऊन अजान रोखण्याचा प्रयत्न केला नाही.”
वक्फ कायद्यासंदर्भात विचारले असता, त्यांनी सांगितले की, “वक्फ कायदा हा संविधानानुसार संसदेत दोन्ही सभागृहांनी पारित केला आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाने काही मुद्द्यांवर सात दिवसांत राज्य सरकारला आपली बाजू मांडण्यास सांगितले असून, सरकार आपले म्हणणे मांडेल.”
Allegations of blocking Azaan: MP Dr. Medha Kulkarni refutes, challenges to prove allegations
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : खुर्ची बदलली असली तरी विकासाचे विमान आणि इंजिनही तेच , एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
- Mahagyandeep : देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
- Kalakendra Artists : तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती, आशिष शेलार यांची माहिती
- NCW अध्यक्षा विजयाताई रहाटकर उद्यापासून हिंसाचारग्रस्त बंगाल दौऱ्यावर; मुर्शिदाबाद, मालद्यात जाऊन देणार पीडित कुटुंबीयांना आधार!!