MPSC : एमपीएससी विद्यार्थ्यांपुढे झुकली; मुख्य परीक्षा पुढे ढकलली, पदसंख्या वाढवण्याच्या मागणीला चालना

MPSC : एमपीएससी विद्यार्थ्यांपुढे झुकली; मुख्य परीक्षा पुढे ढकलली, पदसंख्या वाढवण्याच्या मागणीला चालना

MPSC

विशेष प्रतिनिधी

पुणे : MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा पूर्व परीक्षेतील निकालातील अचूकता, पारदर्शकतेचा अभाव आणि पदसंख्या कमी असल्यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी एकत्र येत पुणे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर 16 एप्रिल रोजी जोरदार आंदोलन छेडले. विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती की, राज्यसेवा मुख्य परीक्षा 45 दिवसांनी घ्यावी आणि एकत्रित परीक्षांमध्ये (PSI, STI, ASO, SR) पदसंख्या वाढवण्यात यावी.MPSC

आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर अखेर MPSCला झुकावे लागले आहे. आयोगाने मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. आयोगाने स्पष्ट केलं आहे की, आता राज्यसेवा मुख्य परीक्षा 27, 28 आणि 29 मे 2025 रोजी आयोजित केली जाईल.

MPSCने याबाबत एक निवेदन प्रसिद्ध करत सांगितले की, सुधारित निकालानुसार 318 उमेदवार नव्याने राज्यसेवा मुख्य परीक्षेस पात्र ठरले आहेत. मात्र, या उमेदवारांना परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून वेळ वाढवण्याची मागणी करत निवेदने देण्यात आली होती.

या निवेदनांची दखल घेत आणि परीक्षेतील आरक्षण विषयक अडचणींचा विचार करता, आयोगाने परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, सदर बदल ही एकवेळची आणि अपवादात्मक बाब आहे

विद्यार्थ्यांची एक महत्त्वाची मागणी म्हणजे PSI, STI, ASO आणि SR या पदांमध्ये भरतीची पदसंख्या वाढवणे. सध्या यावर कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नसला तरी आंदोलनानंतर याविषयी सकारात्मक चर्चा सुरु आहे, असे सूत्रांकडून कळते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्याने आशा निर्माण झाली आहे.

एमपीएससीच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केलं असलं तरी ते पूर्णपणे शांत बसलेले नाहीत. “जर मागण्या पूर्णपणे मान्य झाल्या नाहीत, तर पुन्हा आंदोलन करू,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

MPSC bows down to students; Main exam postponed, spurring demand to increase number of posts

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023