Eknath Shinde : ‘साहेब असते तर चाबकानं फटकारलं असतं’; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जोरदार हल्लाबोल

Eknath Shinde : ‘साहेब असते तर चाबकानं फटकारलं असतं’; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जोरदार हल्लाबोल

Eknath Shinde

विशेष प्रतिनिधी

दरेगाव (जि. सातारा) : Eknath Shinde उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना (ठाकरे गट) आणि उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे. दरेगाव येथील दौऱ्यात बोलताना त्यांनी सांगितलं की, “इतिहास कधीच गद्दारांना माफ करत नाही. ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी केली, काँग्रेससोबत जाणं टाळा असं स्पष्ट सांगितलं असताना जे त्यांच्या विरोधात गेले, त्यांना जनता विसरणार नाही.Eknath Shinde

एकनाथ शिंदे म्हणाले, “बाळासाहेबांचे खोटे, कृत्रिम आवाज काढून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न थिल्लारपणा आहे. जर तुम्ही खरे वारसदार असाल, तर अशा नाट्याची गरज काय? हे केवळ बाळासाहेबांच्या स्मृतींशी खेळ करणं आहे. साहेब असते, तर त्यांनी अशा लोकांना चाबकानं फटकारलं असतं,” असा घणाघात त्यांनी केला. साहेबांचे नकली खोटे आवाज काढून कोणी लोक यांच्याकडे येणार नाहीत. जर असली असाल तर तुम्हाला नकली आवाज काढण्याची गरज काय? हा पोरकटपणा आहे, हा थिल्लार पणा आहे. बाळासाहेबांना वेदना देण्याचं, बाळासाहेबांचा अपमान करण्याचं हे काम आहे, असे ते म्हणाले.

विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देताना शिंदे म्हणाले की, “जनतेनं खोटेपणाला नाकारलं आणि बाळासाहेबांचे खरे विचार पुढे नेणाऱ्यांवर शिक्कामोर्तब केलं. आज आमचं सरकार हे बाळासाहेबांच्या विचारांवर आधारित सरकार आहे,” असा पुनरुच्चार त्यांनी केला.

आपल्या गावातील दौऱ्यावेळी शिंदेंनी स्थानिक नागरिकांनाही संदेश दिला. “फक्त पारंपरिक शेतीवर अवलंबून राहू नका, फळबागा लावा, गटशेती करा. पर्यटनाच्या दृष्टीने ‘नवीन महाबळेश्वर’ ही संकल्पना ग्रामीण विकासासाठी गेमचेंजर ठरेल. निसर्गाचं रक्षण करणं ही काळाची गरज आहे,” असंही ते म्हणाले.

एकूणच, शिंदे यांनी या भाषणातून राजकीय विरोधकांवर टीकेचा बाण सोडत असतानाच, ग्रामविकास आणि पर्यावरण रक्षणाच्या दिशेने सकारात्मक संदेशही दिला.

‘If Saheb had been there, he would have been reprimanded with a whip’; Eknath Shinde launches a strong attack on Uddhav Thackeray without naming him

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023