विशेष प्रतिनिधी
बीड (अंबाजोगाई) : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केवळ डीजेच्या आवाजाचा त्रास होतो, म्हणून तक्रार केल्याच्या रागातून गावातील 36 वर्षीय महिला वकील ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान यांना गावच्या सरपंचासह त्याच्या 10 कार्यकर्त्यांनी शेतामध्ये घेरून लाठ्या, काठ्या आणि पाईपच्या सहाय्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सनगाव गावातील ही महिला वकिल मायग्रेनने त्रस्त असल्यामुळे आपल्या घरासमोरील लाऊडस्पीकर बंद करणे आणि पीठाची गिरणी हटवणे याबाबत संबंधित विभागाकडे कायदेशीर तक्रार दाखल केली होती. यामुळे संतप्त झालेल्या सरपंचाने काही समर्थकांसह तिला गावाजवळील शेतात अडवले आणि अमानुषपणे मारहाण केली.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अंजान यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
या घटनेनंतर राजकीय व कायदेशीर वर्तुळात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सोशल मीडियावर लिहिले की, “एक महिला वकील केवळ ध्वनीप्रदूषणाविरोधात तक्रार करते, आणि तिच्यावर सरपंच व दहा पुरुष मिळून लाठ्या-काठ्यांनी हल्ला करतात, हे लोकशाहीत शोभतं का? हा सरपंच कोणत्या पक्षाचा आहे? त्याचा कारभार किती दडपशाहीने चालतो?”
आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेची चौकशी सुरू आहे. मात्र, या प्रकरणातील सरपंच आणि आरोपी कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी सर्वत्र होत आहे.
Woman lawyer brutally beaten for complaining about DJ’s noise; 10 people including sarpanch charged
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : खुर्ची बदलली असली तरी विकासाचे विमान आणि इंजिनही तेच , एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
- Mahagyandeep : देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
- Kalakendra Artists : तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती, आशिष शेलार यांची माहिती
- NCW अध्यक्षा विजयाताई रहाटकर उद्यापासून हिंसाचारग्रस्त बंगाल दौऱ्यावर; मुर्शिदाबाद, मालद्यात जाऊन देणार पीडित कुटुंबीयांना आधार!!