विशेष प्रतिनिधी
मुंबई : पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाने पैशांअभावी एका गर्भवती महिलेला उपचार नाकारल्याचे घटनेनंतर राज्यातील फडणवीस सरकारने रुग्णालयांना चाप लावण्यास सुरुवात केली आहे. अपघातग्रस्तांवर वेळेवर उपचार होण्यासाठी अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना सरकारने संबंधितांना दिल्या आहेत.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वात आज राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वरळी येथील मुख्यालयात आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या कामकाजाच्या आढावा बैठक झाली. या बैठकीत प्रकाश आबिटकर यांनी आपत्कालीन स्थितीत दाखल होणाऱ्या रुग्णांना उपचाराअभावी प्राण गमवावे लागू नयेत यासाठी त्यांच्यावर विविध योजनांमध्ये अंगीकृत असणाऱ्या रुग्णालयांत 1 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार करण्याचे निर्देश दिलेत.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत अंगीकृत असलेल्या रुग्णालयांनी महिन्यातून एकदा आरोग्य शिबिराचे आयोजन करून किमान 5 रुग्णांवर कॅशलेस उपचार करावेत. यासंबंधी योग्य ती पाऊले उचलावीत, असे निर्देशही आबिटकर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. शासकीय आरोग्य योजनांतील सुधारणांसाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती पुढील एक महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाने पैशांअभावी एका गर्भवती महिलेला उपचार नाकारले होते. त्यानंतर उपचाराला विलंब झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी राज्यभरात आरोग्य व्यवस्थेविषयी संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर रुग्णालयांना चाप बसवणे व राज्यातील जनतेला योग्य दरात व तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी काय उपाययोजना करता येतील याची चर्चा करण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वात या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
Cashless treatment up to Rs 1 lakh for accident victims, Fadnavis government decision
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : खुर्ची बदलली असली तरी विकासाचे विमान आणि इंजिनही तेच , एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
- Mahagyandeep : देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
- Kalakendra Artists : तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती, आशिष शेलार यांची माहिती
- NCW अध्यक्षा विजयाताई रहाटकर उद्यापासून हिंसाचारग्रस्त बंगाल दौऱ्यावर; मुर्शिदाबाद, मालद्यात जाऊन देणार पीडित कुटुंबीयांना आधार!!