Vijaya Rahatkar राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घेतली मुर्शिदाबाद दंगलपीडितांची भेट, मालदाच्या शरणार्थी शिबिरात महिलांनी कथन केले अंगावर शहारे आणणारे अनुभव

Vijaya Rahatkar राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घेतली मुर्शिदाबाद दंगलपीडितांची भेट, मालदाच्या शरणार्थी शिबिरात महिलांनी कथन केले अंगावर शहारे आणणारे अनुभव

विशेष प्रतिनिधी

मालदा : वक्फ सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि जंगीपूर जिल्ह्यात उफाळलेल्या दंगलींमुळे हिंदू समाजावर झालेले अत्याचार दिवसेंदिवस उघड होत आहेत. या दंगलीमुळे घरदार गमावलेल्या आणि भीषण अत्याचार सहन केलेल्या पीडित महिलांची भेट घेण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मालदा जिल्ह्यातील शरणार्थी शिबिराला भेट दिली. अनेक महिलांनी भावनावश होऊन विजयाताईंच्या गळ्यात पडत आपले दुःख कथन केले. Vijaya Rahatkar

महिलांनी सांगितले की, धर्मांध मुस्लिम गुंडांनी त्यांच्या घरांवर हल्ला केला, मालमत्ता लुटली, जाळपोळ केली आणि अनेक महिलांवर शारीरिक अत्याचार केले. तरुण मुलींपासून ते वृद्ध स्त्रिया आणि लहान मुलांपर्यंत कोणालाही त्यांनी सोडले नाही. पोलिसांवरही हल्ले करण्यात आले. परिणामी, तब्बल 800 हून अधिक हिंदू कुटुंबांना घर सोडून मालदामधील शाळांमध्ये आश्रय घ्यावा लागला.

मुर्शिदाबाद, जंगीपूर जिल्ह्यातल्या धर्मांध मुस्लिमांनी तिथे दंगल केली. पोलिसांवर हल्ले करून हजारो हिंदू समाजाच्या वाहनांची आणि मालमत्तांची जाळपोळ केली. तिथल्या शेकडो हिंदू कुटुंबांना परागंदा व्हायला लावले. या धर्मांध मुस्लिमांनी हिंदू महिलांना घरातून खेचून बाहेर काढले. त्यांच्यावर हात टाकले. हिंदू समाजाच्या अनेक मालमत्ता मुस्लिम गुंडांनी बळकावल्या. या सगळ्या भयानक कहाण्या या महिलांनी विजया त्यांच्या कानावर घातल्या.

विजयाताईंनी प्रत्येक महिलेशी आस्थेने संवाद साधत त्यांच्या व्यथा ऐकल्या. त्यांनी महिलांच्या मनावरील जखमांवर मायेची फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आणि राष्ट्रीय महिला आयोग त्यांच्या सोबत ठामपणे उभा असल्याचे आश्वासन दिले. बंगालमधील दंगलपीडित महिलांना न्याय मिळेपर्यंत महिला आयोग स्वस्थ बसणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

NCW Chairperson Vijaya Rahatkar met Murshidabad riot victims, women narrated heart-wrenching experiences in Malda refugee camp

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023