विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Nirupam हिंदी देशाची भाषा आहे. मुलांना मूलभूत हिंदी शिकण्यात काहीही गैर नाही. जे हिंदीला विरोध करतात, ते इंग्रजीला विरोध करत नाहीत. त्यांची मुले इंग्रजीत शिकतात, ते चुकीचे नाही, पण ते हिंदीला विरोध करत आहेत. इंग्रजी हा परदेशी विषय आहे. हिंदी ही देशाची भाषा आहे आणि आपण ती शिकली पाहिजे, अशी भूमिका शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी मांडली आहे.Sanjay Nirupam
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची यंदापासून अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यानुसार पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्यात येणार आहे. हिंदी भाषा अनिवार्य करण्याला काही राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य करण्याला राज्यातील सात शिक्षक संघटनांनी याला विरोध केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याविरुध्द आंदाेलनाचा इशारा दिला आहे. अनेक ठिकाणी मनसेने आंदाेलन सुरूही केले आहे. या पार्श्वभूमीवर बाेलताना निरुपम म्हणाले, ठाकरे गटाचे नेते बाळासाहेबांचे विचार विसरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विचार घेऊन पुढे जात आहेत आणि त्यावर काम करत आहेत. काही मनसे नेत्यांची मुले जर्मन आणि इंग्रजी शिकत आहेत. पण ते हिंदीला विरोध करतात.
बाळासाहेब ठाकरे यांच्या एआय भाषणाच्या मुद्द्यावर संजय निरुपम यांनी टीका केली. ठाकरे गटाच्या लोकांना सांगू इच्छितो की, ठाकरे गट स्वतःच कृत्रिम झाला आहे, तो बाळासाहेबांच्या विचारसरणीपासून दूर गेला आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात झाला आहे.
Those whose children learn in English medium they are against Hindi, alleges Sanjay Nirupam
महत्वाच्या बातम्या
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
- Vijaya Rahatkar राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घेतली मुर्शिदाबाद दंगलपीडितांची भेट, मालदाच्या शरणार्थी शिबिरात महिलांनी कथन केले अंगावर शहारे आणणारे अनुभव
- Raj Thackeray : मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती नको, राज ठाकरे यांची भूमिका
- MPSC : एमपीएससी विद्यार्थ्यांपुढे झुकली; मुख्य परीक्षा पुढे ढकलली, पदसंख्या वाढवण्याच्या मागणीला चालना