विशेष प्रतिनिधी
Pune News: तीन वेळा आमदार राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संग्राम थोपटे यांनी काँग्रेसचाराजीनामा दिला असून 22 एप्रिल रोजी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ (Harshwardhan Sapkal) यांनी थोपटेंना “आत्मघाती निर्णय घेऊ नये” अशी विनंती वजा सूचना केली असून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
माध्यमांशी बोलताना सकपाळ म्हणाले, “अनंतराव थोपटे यांचा संघर्षाचा वारसा संग्राम थोपटे यांनी जपायला हवा होता. काँग्रेसने त्यांचं नाव विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी निश्चित केलं होतं, परंतु फडणवीस यांनीच ते पद मिळू दिलं नाही. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर दबाव आणून ही निवडणूकच होऊ दिली गेली नाही.”
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
ते पुढे म्हणाले, “संग्राम थोपटे विधानसभेचे अध्यक्ष झाले असते, तर शिवसेना फोडणं, राष्ट्रवादी फोडणं, या सर्व गोष्टी टाळता आल्या असत्या. पण देवेंद्र फडणवीस यांनीच हे सर्व घडवलं. त्यांनी काँग्रेसला आणि राज्याला नुकसान केलं. त्यामुळे संग्राम थोपटे यांनी त्यांच्या ‘झाशेत’ जाणं हे आत्मघाती ठरेल.”
2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर थोपटेंना मंत्री किंवा विधानसभा अध्यक्षपद मिळण्याची शक्यता होती. नाना पटोले यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर थोपटे यांनी 30 आमदारांचे समर्थन पत्र दिल्याचे बोलले जात होते. मात्र अंतर्गत गोंधळामुळे विजय वडेट्टीवार यांना संधी मिळाली आणि थोपटे यांची अपेक्षा अपुरी राहिली.
सकपाळ म्हणाले की, “मी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून सातत्याने संग्राम थोपटे यांच्या संपर्कात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांची तब्येत विचारण्यासाठीही त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे अजून नातं संपलेलं नाही. मी आजही आशावादी आहे की ते आत्मघातकी पाऊल उचलणार नाहीत.”
संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पक्षातील वरिष्ठ नेतृत्व या निर्णयावर पुनर्विचार व्हावा यासाठी अजूनही प्रयत्नशील असल्याचे संकेत मिळत आहेत.
Congress is shocked by Sangram Thopte’s decision to join BJP, state president Harshwardhan Sapkal directly accuses Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
- Vijaya Rahatkar राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घेतली मुर्शिदाबाद दंगलपीडितांची भेट, मालदाच्या शरणार्थी शिबिरात महिलांनी कथन केले अंगावर शहारे आणणारे अनुभव
- Raj Thackeray : मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती नको, राज ठाकरे यांची भूमिका
- MPSC : एमपीएससी विद्यार्थ्यांपुढे झुकली; मुख्य परीक्षा पुढे ढकलली, पदसंख्या वाढवण्याच्या मागणीला चालना