विशेष प्रतिनिधी
मुर्शिदाबाद : पश्चिम बंगाल मधल्या मुर्शिदाबाद मध्ये दंगल पीडित महिलांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांच्यासमोर आज प्रचंड आक्रोश केला. त्यांचे दुःख आणि वेदना मांडायला आपल्याकडे शब्द नाहीत, अशा तीव्र भावना विजयाताईंनी नंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी विजयाताई रहाटकर आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या अर्चना मुजुमदार या मुर्शिदाबाद मधल्या दंगलग्रस्त भागात पोहोचल्या. काल त्यांनी मालदा मधल्या शरणार्थी शिबिरात जाऊन दंगल पीडित महिलांची भेट घेतली होती.
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
आज मुर्शिदाबाद मध्ये दंगलग्रस्त भागाला भेट देण्याच्या वेळी तिथल्या दंगल पीडित महिलांनी विजयाताई आणि अर्चनाताई यांच्यासमोर प्रचंड आक्रोश केला. दंगलीच्या काळात कट्टरपंथी मुसलमानांनी केलेल्या अत्याचारांची कहाणी त्यांना सांगितली. कट्टरपंथी मुसलमानांनी हिंदू समाजाची घरे दारे जाळली. तीन हिंदूंची हत्या केली. दुकाने पेटवून दिली. जगण्यासारखे काही शिल्लक ठेवले नाही. महिलांवर हात टाकले. छोट्या मुलींनाही त्यांनी सोडले नाही. दंगल पीडित प्रत्येक महिलेची ही कहाणी विजयाताईंनी आणि अर्चनाताईंनी ऐकून घेतली. राष्ट्रीय महिला आयोग दंगल पीडित महिलांच्या पाठीशी ठाम उभा राहिल्याची ग्वाही दिली. पण या दंगल पीडित महिलांची दु:ख आणि वेदना एवढ्या मोठ्या होत्या की त्याचे वर्णन करायला आपल्याकडे शब्द नाहीत, अशा भावना विजयाताई रहाटकर यांनी व्यक्त केल्या.
NCW chairperson vijayarahatkar in murshidabad
महत्वाच्या बातम्या
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
- Vijaya Rahatkar राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घेतली मुर्शिदाबाद दंगलपीडितांची भेट, मालदाच्या शरणार्थी शिबिरात महिलांनी कथन केले अंगावर शहारे आणणारे अनुभव
- Raj Thackeray : मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती नको, राज ठाकरे यांची भूमिका
- MPSC : एमपीएससी विद्यार्थ्यांपुढे झुकली; मुख्य परीक्षा पुढे ढकलली, पदसंख्या वाढवण्याच्या मागणीला चालना