विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sandeep Deshpande भाजपाला गद्दारी, आता शरद पवार आणि काँग्रेसलाही सोडण्याची तयारी – मग अशा पक्षावर आम्ही विश्वास ठेवायचा तरी कसा?” असा थेट सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला उद्देशून विचारला आहे.Sandeep Deshpande
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जुना इतिहास उलगडत पुन्हा विश्वासघाताच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे.
देशपांडे म्हणाले, “श्रीधर पाटणकर यांनी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यात संवाद घडवून आणण्याचा प्रस्ताव दिला होता. आमच्याकडून तो सकारात्मक घेतला गेला. आमच्या वतीने संतोष धुरी मातोश्रीवर गेले, पण उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आमचं भाजपाशी लग्न झालंय, ते आधी मोडूया, मग साखरपुडा करूया.’ त्यानंतर त्यांनीच फोन घेणं बंद केलं.”
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
ते पुढे म्हणाले की, “2014 मध्ये शिवसेना-भाजप युती तुटली, त्यावेळीही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संवादातून निवडणुका एकत्र लढण्याचा विचार झाला होता. पण अनिल देसाई आणि उद्धव ठाकरे यांनी फोन उचलणं बंद केलं आणि शेवटी शिवसेनेनं आपले उमेदवारी अर्ज वाटायला सुरुवात केली.”
“2014 आणि 2017 मध्ये शिवसेनेनं आम्हाला गद्दारी केली, हे आम्ही विसरलेलो नाही,” असं स्पष्ट करत देशपांडे म्हणाले, “आज संजय राऊत म्हणतात की, राज ठाकरे शत्रूंसोबत जेवतात. पण 2019 पर्यंत तेच राज ठाकरे तुमचे मित्र होते. 2019 पूर्वी भाजपाबद्दल तुम्हाला प्रेम होतं आणि सत्ता वाटपावर सहमती होती. मग 2019 नंतरच भाजप अचानक महाराष्ट्रद्रोही कसा काय झाला?”
“जर मुख्यमंत्रीपदाचे अडीच वर्षे तुम्हाला मिळाले नसते, तर भाजप बदनाम झाला असता का?” असा खडा सवाल त्यांनी केला. “तुम्ही वेळोवेळी आम्हाला गद्दारी केली आहे. मग आज तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात उभा राहतो,” असंही त्यांनी नमूद केलं.
“तुम्ही आधी आम्हाला वाईट ठरवलंत, आता पुन्हा एकत्र येण्याची भाषा करता. आम्ही जेवायला फडणवीस-शिंदेंना बोलावलं, ते वाईट वाटतं; पण तुम्ही चॉकलेट खायला चंद्रकांत पाटलांकडे जाता, ते योग्य कसं?” असा टोलाही देशपांडेंनी लगावला.
त्यांनी स्पष्ट केलं की, “युतीबाबतचा अंतिम निर्णय राज ठाकरेच घेतील. पण 2014 आणि 2017 मध्ये जीभ पोळल्यावर आम्ही ताक फुंकूनच पिऊ पाहतो.”
Betrayal of BJP, now ready to leave Sharad Pawar and Congress, then why should we trust you? Direct question from Sandeep Deshpande
महत्वाच्या बातम्या
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
- Vijaya Rahatkar राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घेतली मुर्शिदाबाद दंगलपीडितांची भेट, मालदाच्या शरणार्थी शिबिरात महिलांनी कथन केले अंगावर शहारे आणणारे अनुभव
- Raj Thackeray : मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती नको, राज ठाकरे यांची भूमिका
- MPSC : एमपीएससी विद्यार्थ्यांपुढे झुकली; मुख्य परीक्षा पुढे ढकलली, पदसंख्या वाढवण्याच्या मागणीला चालना