विशेष प्रतिनिधी
पुणे : आज कुत्र्याला विरोध करताय, उद्या महादेवासमोरचा नंदीही काढा म्हणाल का?” असा रोखठोक सवाल करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Lakshman Hake) यांनी रायगडावरील वाघ्या समाधीच्या समर्थनार्थ आवाज उठवला.
रायगड किल्ल्यावर असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. वाघ्या हा कुत्रा इतिहासात अस्तित्वात नव्हताच, त्यामुळे त्याची समाधी रायगडावर का? असा सवाल छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी या समाधीला हटवण्याची मागणी केली आहे.
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
पत्रकारांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, “छत्रपती शाहू महाराजांचा खंड्या नावाचा कुत्रा होता, त्याचा पुतळा आजही संगम माहुली येथे आहे. तोही काढणार का? रायगडाच्या बाजूच्या वाड्यांमध्ये धनगर समाज राहत आहे. तोरणा किल्ला धानोजी धनगरांनी शिवाजी महाराजांना भेट दिला होता. हे सगळं विसरायचं का?”
“विशाळगडावर एक छत्रपती चिथावणी देतो, दुसरा तिथे माफी मागतो. एक छत्रपती गादीवर आहे, मग अनेक छत्रपती कसे? हा जनतेचा संभ्रम आहे,” असा सवाल करत त्यांनी शिवरायांच्या वंशजांचीही भूमिका प्रश्नचिन्हाखाली आणली.
हाके म्हणाले, “मराठा समाजाचा लढा वेगळा आहे. जरांगे यांनी मोठा लढा उभारला, पण आता त्यांनी शेतकरी, शेती आणि पाण्याच्या प्रश्नांवर बोलावं. त्या लढ्याची दिशा आता वेगळी झाली आहे.”
हाके यांनी माजी मंत्री महादेव जानकर यांच्यावरही टीका करत म्हटले, “त्यांचं जीपीएस गंडलंय. सत्तेच्या जवळ गेल्यावर त्यांनी वंचितांना विसरलं. सत्तासुंदरीने हार घातल्यावर ते बदलले. नाहीतर जानकर यांचे ५०-१०० आमदार झाले असते.”
आपल्या राजकीय इच्छेबाबत बोलताना हाके म्हणाले, “ओबीसी समाजाची इच्छा आहे की ओबीसी व्यक्ती मुख्यमंत्री व्हावा. मी स्वतःला मोठं समजत नाही. पण निर्णयप्रक्रियेपर्यंत पोहोचायचं आहे. मी आवाज उठवत आहे, जनतेने निर्णय घ्यावा.”
Today you are opposing the dog, tomorrow will you also say remove the Nandi in front of Mahadev? Lakshman Hake question
महत्वाच्या बातम्या
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
- Vijaya Rahatkar राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घेतली मुर्शिदाबाद दंगलपीडितांची भेट, मालदाच्या शरणार्थी शिबिरात महिलांनी कथन केले अंगावर शहारे आणणारे अनुभव
- Raj Thackeray : मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती नको, राज ठाकरे यांची भूमिका
- MPSC : एमपीएससी विद्यार्थ्यांपुढे झुकली; मुख्य परीक्षा पुढे ढकलली, पदसंख्या वाढवण्याच्या मागणीला चालना