विशेष प्रतिनिधी
काेलकाता : West Bengal हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? अशी कैफियत मांडत पश्चिम बंगालमधील दंगलग्रस्त भागातील महिलांनी आपली आपबिती राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांना सांगितली.राष्ट्रीय महिला आयाेगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनीही नुकतीच माल्डा आणि इतर दंगलग्रस्त भागाला भेट देऊन महिलांच्या व्यथा जाणून घेतल्या हाेत्या.West Bengal
राज्यपालांनी मुर्शिदाबाद आणि त्यानंतर जाफराबादला भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी बाधित कुटुंबांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला.
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू आहे. या गोंधळात अनेक हिंदू कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक हिंदू कुटुंबांना आपली आयुष्याची कमाई तशीच सोडून मदतीसाठी उभारलेल्या छावण्यांमध्ये राहण्याची वेळ आली आहे. राज्यपालांना पाहून काही महिलांना भावना अनावर झाल्या. त्या स्वत:ला एक प्रश्न विचारण्यापासून रोखू शकल्या नाहीत. त्या सर्व महिला एकच प्रश्न विचार होत्या, हिंदू असण्यात आमचा काय गुन्हा आहे… तसेच ‘आम्हाला वाचवा’ अशा विनवण्याही करत होत्या. बाधित कुटुंबातील काही महिलांनी तर थेट राज्यपालांचे पाय धरले आणि त्यांच्याकडून मदतीची याचना केली.
यावेळी राज्यपालांनी पीडित महिला आणि कुटुंबांना धीर दिला आणि शांतता राखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील, असे सांगितले.हिंसाचाराचे बळी ठरलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटले राज्यपालराज्यपालांनी जाफराबाद येथे झालेल्या हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या हरगोबिंद दास आणि चंदन दास यांच्या घरांना भेट दिली. राज्यपालांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला आणि हिंसाचार करणाऱ्याना शासन करण्याचे आश्वासन दिले. योगायोगाने, एक दिवस आधी या भागात शांतता बैठक झाली होती. तेथील सत्ताधारी पक्षाच्या खासदार आणि आमदारांना या भागात कायमस्वरूपी बीएसएफ कॅम्प उभारण्यास सांगण्यात आले होते. परिसरातील रहिवासी पुन्हा राज्यपालांसमोर तीच मागणी करताना दिसले.बीएसएफ कॅम्पला जमीन देण्यास लोकांनीही तयारी दर्शवली. गरज पडल्यास आम्ही आमची घरेही बीएसएफ कॅम्पला देऊ असे त्यांनी सांगितले. याशिवाय महिला आयोगाच्या सदस्यांनीही पीडित महिलांशी संवाद साधला आणि त्याना धीर दिला. मुर्शिदाबादमध्ये हिंसाचाराच्या घटना थांबल्या असल्या तरीही लोकांच्या मनात त्याबद्दल असलेली भीती स्पष्टपणे दिसते आहे.
Is being Hindu our crime? Women from riot-hit areas of West Bengal plead with Governor
महत्वाच्या बातम्या
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
- Vijaya Rahatkar राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घेतली मुर्शिदाबाद दंगलपीडितांची भेट, मालदाच्या शरणार्थी शिबिरात महिलांनी कथन केले अंगावर शहारे आणणारे अनुभव
- Raj Thackeray : मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती नको, राज ठाकरे यांची भूमिका
- MPSC : एमपीएससी विद्यार्थ्यांपुढे झुकली; मुख्य परीक्षा पुढे ढकलली, पदसंख्या वाढवण्याच्या मागणीला चालना