विशेष प्रतिनिधी
नागपूर: Samruddhi Highway देशातील एक महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा २ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाेकार्पण हाेणार आहे. सध्या नाशिक ते ठाणे हे अंतर पार करण्यासाठी सुमारे साडेतीन तास लागतात. मात्र समृद्धी महामार्गाच्या नवीन टप्प्यामुळे हे अंतर फक्त एका तासात पार करता येणार आहे. परिणामी, नागपूर ते मुंबई प्रवासाची वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. Samruddhi Highway
या महामार्गाची एकूण लांबी ७०१ किलोमीटर असून, यापैकी नागपूर ते इगतपुरीदरम्यानचा ६२५ किलोमीटरचा भाग याआधीच खुला करण्यात आला आहे. उर्वरित ७६ किलोमीटरचा टप्पा इगतपुरी ते अमाने (ठाण्याजवळ) नुकताच पूर्ण झाला आहे. या टप्प्याच्या सुरूवातीनंतर नागपूर ते ठाणे हे अंतर केवळ ७ ते ८ तासांत पार करता येणार असून, मुंबई गाठणेसुद्धा अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे.
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
या अंतिम टप्प्याचे बांधकाम अत्यंत आव्हानात्मक होते, कारण हा रस्ता सह्याद्री पर्वतरांगेतून जातो. टप्प्यात ११ किलोमीटरचा भुयारी मार्ग असून, यामध्ये इगतपुरीजवळील ८ किलोमीटरचा टनेल हा जगातील सर्वात लांब आणि रुंद भुयारी मार्गांपैकी एक मानला जातो. याशिवाय सुमारे ११ किलोमीटरचा भाग एलिव्हेटेड व्हायाडक्ट स्वरूपात आहे, ज्यात २.३ किलोमीटरचा सर्वात लांब पुल आणि ८४ मीटर उंचीचा (सुमारे २० मजली इमारतीइतका) सर्वात उंच पिलर आहे. या अद्वितीय रचनेमुळे वाहनचालकांना आता कसारा घाटाच्या वळणदार आणि वेळखाऊ मार्गावरून प्रवास करावा लागणार नाही. त्याऐवजी थेट भुयारी मार्ग आणि उंच पूल वापरून प्रवास अधिक गतीने आणि सुरक्षितपणे करता येईल.
समृद्धी महामार्गाचे टप्पे व प्रगती
नागपूर ते शिर्डी (५२० किमी): डिसेंबर २०२२
शिर्डी ते भरवीर (८० किमी): मे २०२३
भरवीर ते इगतपुरी (२५ किमी): मार्च २०२४
इगतपुरी ते अमाने (७६ किमी): मे २०२५ (अंदाजे)
The final phase of Samruddhi Highway will be inaugurated on May 2nd, inaugurated by the Prime Minister
महत्वाच्या बातम्या
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
- Vijaya Rahatkar राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घेतली मुर्शिदाबाद दंगलपीडितांची भेट, मालदाच्या शरणार्थी शिबिरात महिलांनी कथन केले अंगावर शहारे आणणारे अनुभव
- Raj Thackeray : मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती नको, राज ठाकरे यांची भूमिका
- MPSC : एमपीएससी विद्यार्थ्यांपुढे झुकली; मुख्य परीक्षा पुढे ढकलली, पदसंख्या वाढवण्याच्या मागणीला चालना