विशेष प्रतिनिधी
पुणे : गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत, या प्रकरणात दोषी ठरणाऱ्या सर्व व्यक्तींना कठोर शिक्षा व्हावी, अशी स्पष्ट मागणी केली आहे. “उशिरा का होईना, डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पण ही कारवाई पुरेशी नाही. या प्रकरणात जे कोणी जबाबदार असतील, त्या सगळ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” असे सुळे यांनी सांगितले.
अहवालाबाबतही नाराजी व्यक्त करताना त्या म्हणाल्या, “हा अहवाल रुग्णालयाला वाचवण्याचा एक प्रयत्न वाटतो. हत्येस जबाबदार लोकांना निर्दोष ठरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, जे अत्यंत दुर्दैवी आहे,” असे सुळे म्हणाल्या. “माझी भूमिका स्पष्ट आहे – महाराष्ट्रात कुठल्याही लेकीवर अन्याय होणार नाही. त्यामुळेच आम्ही याबाबत न्यायालयातही धाव घेतली आहे,” असेही त्या म्हणाल्या.
“मुख्यमंत्री एकीकडे मुलींसाठी आपुलकीची भाषा करतात, पण भिसे प्रकरणात त्यांच्या सुरुवातीच्या आणि आत्ताच्या भूमिकेत जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे आता रिपोर्टवर अडकण्यापेक्षा सत्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे,” असंही सुळे यांनी ठणकावून सांगितलं.
यवतमाळ जिल्ह्यातील पाणीटंचाईबाबत बोलताना सुळे म्हणाल्या, “जलजीवन मिशन देशभर राबवलं गेलं, पण डबल इंजिन सरकार असलेल्या महाराष्ट्रातही पाणीटंचाई आहे ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. नियोजनशून्यतेमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे, हे राज्यकर्त्यांचं अपयश आहे.”
बीडमधील दहशतीच्या वातावरणावर तीव्र चिंता व्यक्त करत सुळे म्हणाल्या, “बीडमध्ये कुणाची दहशत आहे हे स्पष्ट नाही. वर्दीला कोणी घाबरत नाही, पोलिसांची भीतीच उरलेली नाही. गृहखात्याने तातडीने याबाबत बैठक घेऊन कठोर पावले उचलली पाहिजेत.”
ठाकरे कुटुंब एकत्र येत असल्याबाबत सुळे म्हणाल्या, “कुटुंब एकत्र येणं ही आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्राची संस्कृती दुसऱ्याच्या आनंदात सामील होण्याची आहे. त्यामुळे त्यांचा आनंद साजरा करू द्या.”
संग्राम थोपटे यांचा मेळावा आणि संभाव्य निर्णयावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले, “त्यांचा निर्णय येऊ द्या, मग मी त्यावर बोलेन.”
राजू शेट्टी, बच्चू कडू, महादेव जानकर यांच्या मेळाव्यावर बोलताना सुळे म्हणाल्या, “काल बच्चू कडू यांचा फोन आला होता पण आमचं बोलणं होऊ शकलं नाही. त्यांचं मत समजून घेतल्याशिवाय प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही.”
All Those Responsible in Bhise Death Case Must Be Punished: Supriya Sule
महत्वाच्या बातम्या
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
- Vijaya Rahatkar राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घेतली मुर्शिदाबाद दंगलपीडितांची भेट, मालदाच्या शरणार्थी शिबिरात महिलांनी कथन केले अंगावर शहारे आणणारे अनुभव
- Raj Thackeray : मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती नको, राज ठाकरे यांची भूमिका
- MPSC : एमपीएससी विद्यार्थ्यांपुढे झुकली; मुख्य परीक्षा पुढे ढकलली, पदसंख्या वाढवण्याच्या मागणीला चालना