Kapil Patil : मराठी माणूस म्हणजे फक्त ठाकरे-पवारच का? कपिल पाटलांचा थेट सवाल, मराठी हिताच्या राजकारणावर घणाघाती टीका

Kapil Patil : मराठी माणूस म्हणजे फक्त ठाकरे-पवारच का? कपिल पाटलांचा थेट सवाल, मराठी हिताच्या राजकारणावर घणाघाती टीका

Kapil Patil

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Kapil Patil  मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याचे संकेत देत आहेत, हे स्वागतार्ह असलं तरी मराठी माणूस म्हणजे फक्त ठाकरे आणि पवारच का?” असा थेट सवाल माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी यामागचे राजकारण उघड करत ट्विटरवरून अनेक मुद्द्यांवर ठाकरे बंधूंना जाहीर आव्हान दिलं आहे.Kapil Patil

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच एकमेकांबद्दल सौहार्दपूर्ण भूमिका घेतली असून संभाव्य युतीची चर्चा सुरू झाली आहे. दोघांनीही मराठी माणसाच्या हितासाठी भांडणं बाजूला ठेवण्याचं वक्तव्य केल्यामुळे हा संवाद पुढे गेला. मात्र कपिल पाटील यांना या घोषणांमध्ये दाखवलेली “मराठी अस्मिता” ही केवळ वरवरची आणि संकुचित असल्याचा आरोप केला आहे.कपिल पाटील म्हणतात, “ठाकरे नावाचं गारुड महाराष्ट्रात आहे, ते मान्यच. पण दोन भावांचं पुन्हा जवळ येणं म्हणजे महाराष्ट्राचा किंवा मराठी माणसाचा प्रश्न सुटेल का?” त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले . दोघे एकत्र आले तर बदलापूर, नालासोपारा, पनवेलसारख्या भागात विस्थापित झालेला मुंबईचा मूळ मराठी माणूस पुन्हा मुंबईत परतणार का? गिरणी कामगारांच्या वारसांना घरं मिळणार का? बीएमसीची सार्वजनिक रुग्णालयं सुधारतील का?पालिकेची कंत्राटं मराठी माणसालाच मिळतील का?

ते पुढे म्हणतात, “राज ठाकरेंनी सर्वच पक्षांतील मराठी जनतेला एकत्र यावं असं आवाहन केलं. पण संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलेल्या खंतांचं काय?”

सामान्य बहुजन शिवसैनिकांचा चेहरा बनलेले एकनाथ शिंदे, कोकणातले नारायण राणे, ओबीसींचा प्रतिनिधी असलेले छगन भुजबळ हे सगळेही मूळ शिवसैनिक आहेत. मग हे मराठी नाहीत का?”मराठी बोलणारा मुसलमान, वसईचा ख्रिश्चन, मराठा समाजातील गरजवंत, आंबेडकर विचारांवर चालणारा बौद्ध हे सगळेही मराठी समाजाचाच भाग नाहीत का? असा प्रश्न त्यांनी केला.

“एकत्र येण्यामागे जर खरंच मराठी समाजाच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरं मिळणार असतील तर स्वागतच. अन्यथा मराठी तरुणांची डोकी फोडण्यासाठीच ही नाटकी एकजूट असेल,” असा आरोपही त्यांनी दिला.

Is a Marathi man only Thackeray-Pawar? Kapil Patil’s direct question, harsh criticism on the politics of Marathi interests

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023