विशेष प्रतिनिधी
नाशिक : Suhas Kande नांदगाव विधानसभा मतदारसंघात समीर भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यातील वाद पुन्हा पेटला आहे. समीर भुजबळ हा अजित पवारांकडून हुसकलेला माणूस आहे. समीर भुजबळांवर मला दया येत आहे. हुसकलेले असताना ते परत येत आहेत, अशी टीका आमदार सुहास कांदे यांनी केल्याने भुजबळ – कांदे वाद पुन्हा पेटला आहे.Suhas Kande
नांदगाव विधानसभा निवडणूक ही कांदे-भुजबळ यांच्या अंतर्गत वादामुळे गाजली होती. त्यावेळी कांदे-भुजबळ यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले होते. पत्रकारांशी बोलताना माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी मी मुंबई शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. परंतु, तो अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही. मी यापूर्वीही पक्षाच्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिलो आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघात आमच्या कार्यकर्त्यांना त्रास सहन करावा लागला होता, म्हणूनच मी त्यावेळी उमेदवारी केली होती. त्यानंतर आता पक्षाने मला काय जबाबदारी द्यायची, हे ठरवावे.
याला उत्तर देताना कांदे म्हणाले, माझ्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समीर भुजबळ यांचा राजीनामा स्वीकारलादेखील होता. महायुतीच्या विरोधात ज्यांनी कामं केली, त्या सगळ्यांचीच हकालपट्टी केली जाईल, असं ठरवलं होतं. महायुतीमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत.
ईडी, सीबीआय यापासून वाचण्यासाठी समीर भुजबळ अजित पवारांच्या पुढे-पुढे करत आहेत. महायुतीची सत्ता आली, मात्र भुजबळ यांना मंत्रिपद मिळालेलं नाही. भुजबळ साहेबांचं वय झालं, त्यांचं जाऊ द्या मात्र, समीर भुजबळ यांची दया येते.
Controversy flares up again, Suhas Kande alleges that Sameer Bhujbal is a man who was kidnapped by Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : उध्दव – राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले
- Chief Minister : तंत्रज्ञानाच्या मदतीने शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा, मुख्यमंत्र्यांचे डाॅक्टरांना आवाहन
- Supreme Court : मग संसद भवनच बंद करा.. उपराष्ट्रपतींपाठाेपाठ भाजपचे खासदार सर्वाेच्च न्यायालयावर बरसले
- West Bengal : हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागातील महिलांची राज्यपालांपुढे कैफियत