विशेष प्रतिनिधी
मुंबई : निवडणुकीतील पराभवामुळे मनावर परिणाम झाल्याने काँग्रेसचे नेते राहुल गांधी विदेशात जाऊन देशाची करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. पराभवाचे आत्मचिंतन करून त्यांनी जनतेत जाऊन काम करावे, असा सल्लाही यावेळी फडणवीसांनी दिला.
राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून ब्राउन युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित चर्चासत्रात त्यांनी भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. “व्यवस्थेत गडबड आहे. निवडणूक आयोगाने तडजोड केली आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले.
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “राहुल गांधी परदेशात जाऊन भारतीय लोकशाही, संविधानिक संस्था आणि देशाची बदनामी करत आहेत. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्या मनावर परिणाम झाल्यासारखा वाटतो.”एक विरोधी पक्षनेता जर सातत्याने परदेशात जाऊन देशाविरोधात वक्तव्य करत असेल, तर ते कोणाचा अजेंडा राबवत आहेत, अशी शंका निर्माण होते. त्यांनी जनतेत जाऊन काम केले पाहिजे. जगभरात फिरून भारताची बदनाम करून त्यांची मते वाढणार नाहीत. जनतेत जर त्यांनी विश्वासार्हता निर्माण केली तरच त्यांची मते वाढतील. ते करायच्या ऐवजी भारताला बदनाम करण्याचे काम त्यांच्याकडून चालले आहे. महाराष्ट्रात ते हरले, हरियाणा हरले, दिल्लीत हरले. आता मतदान प्रक्रियेवर वश्वास व्यक्त करणे बाळबोध प्रकार आहे. भारताची बदनामी त्यांनी बंद करावी असे आमचे आवाहन आहे.
Instead of defaming India abroad, go and work among the people, CM Devendra Fadnavis advises Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : उध्दव – राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले
- Chief Minister : तंत्रज्ञानाच्या मदतीने शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा, मुख्यमंत्र्यांचे डाॅक्टरांना आवाहन
- Supreme Court : मग संसद भवनच बंद करा.. उपराष्ट्रपतींपाठाेपाठ भाजपचे खासदार सर्वाेच्च न्यायालयावर बरसले
- West Bengal : हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागातील महिलांची राज्यपालांपुढे कैफियत