विशेष प्रतिनिधी
साेलापूर : Uddhav-Raj जर उद्धव साहेब आणि राज साहेबांचे विचार जुळले आणि युती झाली, तर आम्ही शिवसैनिक सोलापूर जिल्ह्यातून हत्तीवरून साखर आणि पेढे वाटू, अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केली आहे.Uddhav-Raj
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अर्थात शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) सोबत येण्यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीसंदर्भात बोलताना कोळी म्हणाले,एक शिवसैनिक म्हणून उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र येण्याची चर्चा सुरू झाल्याने आम्ही अत्यंत आनंदी आहोत. जर उद्धव साहेब आणि राज साहेबांचे विचार जुळले आणि युती झाली, तर आम्ही शिवसैनिक सोलापूर जिल्ह्यातून हत्तीवरून साखर आणि पेढे वाटू.
दिल्लीश्वराच्या राजकारणाला महाराष्ट्र कंटाळला आहे. हे सुडाचे राजकारण याच महाराष्ट्राच्या मातीत गाडण्यासाठी उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे आणि आम्ही त्याची वाट बघत आहोत.चांगली गोष्ट होत असतानाच, काही माझ्या सारख्या कार्यकर्त्यांनी, दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी भान ठेवायला हवे. काल परवाच मनसेचे संदीप देशपांडे उद्धव साहेबांसंदर्भात काही बोलले. मला त्यांना एवढेच सांगायचे आहे की, संदीपजी उंटाचा मुका घ्यायला जाऊ नका. आपली तेवढी क्षमता नाही. उद्धव साहेब आणि राज साहेब निर्णय घ्यायला मजबूत आहेत. त्यांचा निर्णय शिवसेना आणि मनसैनिकांसाठी अंतिम आहे. युती झाल्यानंतर आपण एकत्रितपणे काम करून, महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करून गद्दारांना आणि दिल्लीश्वराला याच महाराष्ट्रात गाडूया,
If Uddhav-Raj alliance is formed, sugar will be distributed on elephants, Thackeray group leader declares
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : उध्दव – राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले
- Chief Minister : तंत्रज्ञानाच्या मदतीने शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा, मुख्यमंत्र्यांचे डाॅक्टरांना आवाहन
- Supreme Court : मग संसद भवनच बंद करा.. उपराष्ट्रपतींपाठाेपाठ भाजपचे खासदार सर्वाेच्च न्यायालयावर बरसले
- West Bengal : हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागातील महिलांची राज्यपालांपुढे कैफियत