विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सूफी अरेबियाने मानवंदना दिली आहे. विमानाला सौदी लष्कराकडून जेट फायटरने एस्कॉर्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजेशाही स्वागत केले. Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सौदी अरेबियातील दौरा हा केवळ राजनैतिकच नव्हे तर सामरिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा ठरतोय. मोदी यांच्या विमानाचे सौदी अरेबियाच्या लष्कराकडून विशेष जेट फायटर एस्कॉर्ट करताना करण्यात आलेले स्वागत हे सौदीच्या वतीने दिला गेलेला सर्वोच्च सन्मान मानला जात आहे. या घटनेमुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.
पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. विमान सौदी हवाई हद्दीत प्रवेश करताच, सौदीच्या लष्करातील एफ-15 आणि टायफून फाइटर जेट्सनी भारतीय पंतप्रधानांच्या विमानाला एस्कॉर्ट करण्यास सुरुवात केली. या अत्याधुनिक लढाऊ विमानांनी मोदींच्या विमानाच्या दोन्ही बाजूंनी उड्डाण करत संरक्षण दिलं. यासह एक खास व्हिडीओ क्लिप देखील सौदी लष्कराच्या सोशल मीडिया हँडल्सवरून प्रसिद्ध करण्यात आली आहे, ज्यामध्ये ‘India-Saudi ties soaring high’ असे कॅप्शन दिले आहे. Narendra Modi
हा सोहळा केवळ सौजन्याचा नव्हे, तर भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील वाढत्या धोरणात्मक सहकार्याचं प्रतिक मानलं जात आहे. संरक्षण, उर्जा, तंत्रज्ञान, व्यापार आणि गुंतवणूक यांसारख्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांनी गेल्या काही वर्षांत घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले आहेत. सौदी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील व्यक्तिगत संवाद आणि समन्वयामुळे हे संबंध अधिक बळकट झाले आहेत.
पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा विविध पातळ्यांवर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यामध्ये उर्जा सुरक्षा, डिजिटल इनोव्हेशन, ग्रीन इनिशिएटिव्ह्ज आणि गल्फ देशांमध्ये भारतीय समुदायाच्या सुरक्षेचा मुद्दा अग्रक्रमावर आहे. सौदी अरेबियामध्ये सुमारे 25 लाख भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत, जे भारताच्या परकीय चलनात मोठा वाटा उचलतात.
या एस्कॉर्टद्वारे सौदीने केवळ स्वागताचं औपचारिक संकेतच दिले नाही, तर भारताला सामरिकदृष्ट्या एक महत्त्वाचा भागीदार मानल्याचेही सूचित केलं आहे. याआधी अशा स्वरूपाचा सन्मान अमेरिकेचे राष्ट्रपती किंवा चीनसारख्या शक्तीशाली राष्ट्रांच्या प्रमुखांनाच दिला गेला आहे.
या दौऱ्यानंतर भारत-सौदी संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा क्षण दोन्ही देशांमधील मैत्रीचा आणि विश्वासाचा नवा अध्याय ठरणार आहे, यात शंका नाही.
Narendra Modi receives royal welcome, plane escorted by jet fighter from Saudi military
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : उध्दव – राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले
- Chief Minister : तंत्रज्ञानाच्या मदतीने शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा, मुख्यमंत्र्यांचे डाॅक्टरांना आवाहन
- Supreme Court : मग संसद भवनच बंद करा.. उपराष्ट्रपतींपाठाेपाठ भाजपचे खासदार सर्वाेच्च न्यायालयावर बरसले
- West Bengal : हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागातील महिलांची राज्यपालांपुढे कैफियत