विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईवर 26 नोहेंबर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले पोलिस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक पदी नियुक्ती देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पवार यांना परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक पदावरील थेट नियुक्तीचे आदेश प्रदान केले.
मुंबई पोलिसमध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या अंबादास पवार यांना दहशतवादी हल्ल्यामध्ये वीरमरण आले होते. त्यावेळी ते अवघ्या 27 वर्षांचे होते.
मुळचे सातारा जिल्ह्यातील शिरूरकवठे गावचे असलेल्या पवार यांनी पाडेगाव येथील आश्रमशाळेत राहुन नववी केली. गावातील महाविद्यालयात बारावी पर्यंत शिक्षण घेतले. लहानपणापासून पोलिस होण्याची इच्छा असलेले अंबादास २००५ मध्ये वयाच्या चोविसाव्या वर्षी मुंबई पोलिस दलात दाखल झाले .
त्याच वर्षी त्यांचा निरा येथील शिवाजी देशमुख यांची कन्या कल्पना यांच्याशी विवाह झाला. पत्नी गावीच होत्या. अंबादास पवार यांनी लहानभाऊ सुनीलचा विवाह जमविला डिंसेबर २००८ मध्ये विवाहाची तारीख धरली. आपल्या भावाच्या लग्नासाठी त्यांनी बस्ता खरेदी केला. सुट्टी घेऊन गावी जाण्याचा विचार होता. त्यांनी पत्नी कल्पना यांना फोनवर तसे सांगितले होते .
२६ नोव्हेंबर २००८ रोजी अंबादास छत्रपती शिवाजी टर्मिनस कडे लोकलने जात होता. कल्पना यांचा लोकलमध्ये फोन चालू होता . छत्रपती शिवाजी टर्मिनल जवळ आले होते. तेवढ्यात अंबादास कल्पनाला म्हणाले कि कल्पना स्टेशनवर फटाक्यांचा आवाज येतोय मी फोन बंद करतो . अंबादास लोकलमधून खाली उतरले तर बेधुंद गोळीबार चालू होता. एका पोलिस मित्राची एके ४७ रायफल लॉक झाली. ही एके ४७ रायफलने अंबादासने घेतली आणि लॉक काढले आणि अंबादासने अतिरेक्यांना लक्ष केले. अंबादास आपला खात्मा करणार हे अतिरेक्याच्या लक्षात आले. त्यांनी अंबादासला लक्ष केले अंबादास रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि वीरगती प्राप्त झाला.
त्यांच्या मागे पत्नी कल्पना आणि चिमुकला मुलगा विवेक होते.विवेक लहान असताना वडील अंबादास शहीद झाले. त्याच्यामुळे वडील आठवत नाही.
अंबादास यांच्या पत्नी कल्पना यांना मुख्यमंत्र्यांनी थेट परीक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती दिली आहे. मुख्यमंत्री यांच्या या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना कल्पना पवार म्हणाल्या, “माझ्या पतीप्रमाणेच मलाही आता देशसेवेची संधी मिळाली आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, लाडक्या बहिणींचे आणि देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या शहीद वीरांचे आहे, हे माझ्या या नियुक्तीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.”
Mumbai 26/11 attack Martyr’s wifewife appointed as Deputy Superintendent of Police, CM orders
महत्वाच्या बातम्या
- लग्नानंतर सात दिवसांनी हनिमूनसाठी गेलेल्या भारतीय नाैदलातील अधिकाऱ्याचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू
- मेळघाटातील कुपाेषणावर काय उपाययाेजना केल्या? काॅंग्रेसच्या नेत्या यशाेमती ठाकूर यांचा सवाल
- Ashish Shelar : उद्धव ठाकरे हे मुंबईतील भूखंड घोटाळ्याचे बादशहा, आशिष शेलार यांचा आरोप
- UPSC 2024 निकाल जाहीर, शक्ती दुबे देशात अव्वल, पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा ; महाराष्ट्राची कामगिरी उजळली